माकप च्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन !
लोकशाही च्या आत्म्यावर प्रहार सहन करणार नाही.- कॉ.आडम मास्तर
सोलापूर दिनांक :- भारतीय संविधान हा भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे . भारतीय संविधानातील स्वातंत्र्य,लोकशाही,समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता मूल्यांवर आघात होत आहे.लोकशाहीच्या राज्यात आज संविधानाला हात लावण्याची भाषा बोलली जाते.हा एक प्रकारचा संविधानावरचा प्रहार आहे आणि तो आम्ही कदापि सहन करणार नाही असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना आडम म्हणाले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शुक्रवारी सकाळी 9 वाजता दत्त नगर मध्यवर्ती कार्यालय येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शाहीर प्रशांत म्याकल व प्रजा नाट्य मंडळाचे कलावंत भीम गीत गाऊन अभिवादन केले.
यावेळी माकपच्या नगरसेविका कामिनी आडम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
प्रास्तविक माकपचे जिल्हा सचिव अँड एम एच शेख यांनी केले.
यावेळी माजी नगरसेविका नसीमा शेख,नलिनीताई कलबुर्गी, सुनंदा बल्ला, युसूफ शेख मेजर ,व्यंकटेश कोंगारी, कुरमय्या म्हेत्रे,माशपा विटे,अशोक बल्ला,दत्त चव्हाण,श्रीनिवास गड्डम विरेंद्र पद्मा, बाळासाहेब मल्याळ,विजय हरसुरे,दाऊद शेख,नरेश दुगाने,लिंगवा सोलापुरे,अकिल शेख,इलियास सिद्दीकी अभिजित निकंबे,आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल वासम तर सिटू चे जिल्हाकोषाध्यक्ष दीपक निकंबे यांनी मानले.
तदनंतर पार्क चौक येथे अभिवादन करण्यात आले.
0 Comments