दत्त जयंती वारी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
कळंब-(प्रतिनिधी)
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिजधाम याच्यावतिने जगतगुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान उपपिठ मराठवाडा माऊली माहेर या आश्रमावर दि.१०ते १४ ङिसेंबर या कालावधीमध्ये भव्य दत्त जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या वारी उत्सवात संस्थानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.याचेच औचित्य साधून मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन व गरीब व गरजू व्यक्तींना परमपूज्य जगतगुरू नरेंद्राचार्यजी महाराज व परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या उपस्थितीत दि.११ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता गरीब, गरजू शेत शेतकऱ्यांना 100 फवारणी पंपाचे मोफत वाटप केले जाणार आहे. दि.१३ रोजी समस्या व मागदर्शन आणि दि १४ रोजी साधक दिक्षा असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
या दत्त जयंती वारी उत्सवा निमित्त देशभरातुन जवळपास लाखो भक्तगण उपस्थित राहणार असल्याची माहिती जगतगुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान उपपिठ मराठवाडा श्रीक्षेत्र शिमुरगव्हाण चे व्यवस्थापक सुरेश मोरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. या कार्यक्रमासाठी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील सर्व निरीक्षक जिल्हाध्यक्ष, जिल्हा सेवा समितीचे अध्यक्ष सर्व तालुकाप्रमुख व सर्व सतसंग प्रमुख आरती प्रमुख कमिटीतील सदस्य मंडळी व भाविक भक्त यांनी ११ डिसेबंर रोजी जगद्गुरु नरेंद्र चार्य जी महाराज यांचा आशीर्वाद घेण्यासाठीव दत्त जयंती वारी उत्सवासाठी उपपीठ मराठवाडा सिमुरगव्हाण तालुका पाथरी येथे उपस्थित रहावे तसेच समस्यामार्गदर्शन व दर्शन सोहळया साठी मोठ्या संख्यने हजर राहावे
याच बरोबर दि.१० डिसेंबर पासून येणाऱ्या सर्व भाविकांना मोफत महाप्रसाद वअन्नदान होणार आहे.तरी उस्मानाबाद जिल्हयातील भाविक भक्तांनी या दत्त जन्म उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन मराठवाडा उप पीठाचे प्रसिद्धीप्रमुख तथा उस्मानाबाद जिल्हा सेवा समितीचे प्रासिध्दी प्रमुख विलास मुळीक यांच्या वातिने करण्यात आहे
0 Comments