मोहोळ, प्रतिनिधी
आष्टी उपसा सिंचन योजनेच्या डाव्या कालव्याचे रखडलेले काम अखेर सुरु होण्याचा मार्गी लागला असून कुर्डूवाडी-मिरज रेल्वेलाईन खालील बोगदा तयार करण्यासाठी निविदा करण्यात आली असून यासाठी आमदार यशवंत माने यांनी पाठपुरावा केला आहे.
आष्टी उपसा सिंचन योजनेच्या डाव्या कालव्याचे रखडलेले काम हाती घेण्यात यावे यासाठी या भागातून शेतकऱ्यांनी नुकतेच कुरणवाडी येथील कार्यक्रमात जि प सदस्य बाळराजे पाटील यांच्याकडे मागणी केली होती,त्यानुसार याची दखल घेऊन आमदार यशवंत माने यांनी आष्टी उपसा सिंचन योजनेच्या डाव्या कालव्याचे रेल्वे क्रॉसिंग चे काम तात्काळ मार्गी लावण्यासमंधी समंधित विभागाची भेट घेतली.हा कालवा कुर्डूवाडी-मिरज या रेल्वे लाईन खालून जातो.या ठिकाण बोगदाचे काम रेल्वे विभाग स्वतः करणार असुन या कामासाठी जलसंपदा विभागाने तीन कोटी ५० लाख रुपये रेल्वे विभागाकडे वर्ग केले,परंतु रेल्वे विभागाकडून कोणतीही हालचाल होत नव्हती.मोहोळचे नूतन आमदार यशवंत माने यांनी काल मोहोळ येथे बाळराजे पाटील यांचे उपस्थितीत घेतलेल्या आढावा बैठकीत आष्टी उपसा सिंचन योजनेचे उपअभियंता बाळासाहेब जाधव यांनी याबाबत सविस्तर माहिती आमदार माने यांना दिली.आ.माने यांनी संबंधित रेल्वे अधिकाऱ्याला भेटण्यासाठी तातडीने जाधव यांना घेऊन सोलापूर रेल्वे ऑफिस गाठले व संबंधित अधिकाऱ्यांना भेटून ही बाब कानावर घालून तातडीने मार्गी लावण्याची विनंती केली.याची दखल घेऊन अधिकाऱ्यांनी तात्काळ टेंडर फ्लॅश केली असून निवेदेचे काम पूर्ण होउन जानेवारी मध्ये कामाला सुरुवात होणार आहे.
मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजना असून या योजनेतील उजव्या कालव्याचे काम सुमारे तीस किलोमीटर पर्यंत पूर्ण झाले आहे तर डावा कालवा फायदा हा मोहोळ तालुक्यातील आष्टी, तेलंगवाडी ,शेटफळ ,कुरणवाडी मोडनिंब,बैरागवाडी व माढा तालुक्यातील मोडनिंब बैरागवाडी या डावा कालवा याचा फायदा मिळणार आहे.
चौकट-
या डावा कालव्याचे काम रेल्वे क्रॉसिंग मुळे अपुरे राहिल्यामुळे सीना-माढा योजनेतून पाठपुरावा करून बाळराजे पाटील यांनी आष्टी व कुरणवाडी गावातील ओढ्यांना पाणी सोडण्यासाठी प्रयत्न केला होता.या पाण्याचे पूजन नुकतेच पाटील यांच्या हस्ते कुरणवाडी येथे झाले होते याप्रसंगी आष्टी उपसा सिंचन योजनेच्या रखडलेल्या कामाबाबत च्या तक्रारी येथील शेतकऱ्यांनी केल्या होत्या याची दखल घेऊन काम होणार असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
फोटो ओळी-अधिकाऱ्यांबरोबर आष्टी उपसा सिंचनच्या डाव्या कालव्यात संबंधी चर्चा करताना आमदार यशवंत माने.
(चौकट मध्ये बाळराजे पाटील यांचा फोटो वापरावा)
0 Comments