Hot Posts

6/recent/ticker-posts

मुक्त रिक्षा परवाना बंद करा यासह सहा ठराव मंजूर करत महाराष्ट्र रिक्षा पंचायत कार्यकारिणीची बैठक संपन्न


















मुक्त रिक्षा परवाना बंद करा यासह सहा ठराव मंजूर करत
महाराष्ट्र रिक्षा पंचायत कार्यकारिणीची बैठक संपन्न

महाराष्ट्र रिक्षा पंचायत कार्यकारिणीची बैठक नुकतीच पुणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, मालधक्का चौक पुणे येथे घेण्यात आली यावेळी मुक्त रिक्षा परवाना बंद करा, रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करा, शेतकऱ्यांच्या प्रमाणे कर्ज बाजारीपणामुळे रिक्षाचालक आत्महत्या करत आहेत. रिक्षाचालकांचे कर्ज माफ करा, रिक्षाचालकांच्या लढ्यासाठी महाराष्ट्र कृती समिती जो निर्णय घेईल त्यात संपूर्ण पुणे पाठिंबा देईल सहभाग घेण्यात येईल,
 महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली, यावेळी पंचायत वरिष्ठ उपाध्यक्ष आनंद तांबे ,प्रल्हाद कांबळे, दत्ता शिंदे सह पुणे पिंपरी-चिंचवड शहरातील आणि महाराष्ट्रातील पदाधिकारी उपस्थित होते
बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात यावी,
या सर्व प्रश्नांसाठी रिक्षा संघटनेचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री यांना भेटणार यासह विविध ठराव  या बैठकीत  मंजूर करण्यात आले,शासनाच्यावतीने मुक्त रिक्षा परवाना सुरू आहे त्यामुळे रिक्षांची संख्या वाढत असून रिक्षा व्यवसायांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे त्यामुळेच रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे,  आर्थिक संकटामुळे आणि कर्जबाजारी झाल्यामुळे रिक्षाचालकांनी आत्महत्या केल्या आहेत,रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली असून शासनाने तातडीने रिक्षा परमिट बंद करावे, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली,
 रिक्षा परमिट बंद व्हावे यासाठी रिक्षाचालक-मालक यांच्यावतीने सह्याची मोहीम राबवली जाणार असून महाराष्ट्रातील पाच लाख सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्याचा ठराव देखील यावेळी मंजूर करण्यात आला,
यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली ती पुढील प्रमाणे
पुणे शहर अध्यक्ष सदाशिव पवार पाटील, महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळा जगदाळे (पनवेल) महाराष्ट्र सहसचिव राजू शिदगणे (सोलापूर) महाराष्ट्र सरचिटणीस शिवाजी मोरे (डोबवली) महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख संतोष आमले (पनवेल) महाराष्ट्र संघटक सचिव लखन लोंढे ( उरुळी कांचन ) , पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भीमराव मोरे ,पुणे जिल्हा शहर अध्यक्ष नितीन शिंदे नवीन पनवेल शहर अध्यक्ष रामचंद्र चौधरी, पनवेल शहर अध्यक्ष शैलेश पवार,पुणे शहर उपाध्यक्ष सुनिल देवकुळे , सागर धर्में, हवेली तालुका अध्यक्ष इस्माईल शेख ,उपाध्यक्ष विजय मुख्तार, कार्याध्यक्ष गणेश लव्‍हाळे, सचिव अर्जुन देशमुख, शहर अध्यक्ष विलास अवतरे , पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष सोमनाथ कलाटे ,उपाध्यक्ष अजित बराडे आदि पदाधिकाऱ्यांची निवड यावेळी करण्यात आल
Reactions

Post a Comment

0 Comments