Hot Posts

6/recent/ticker-posts

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ




















सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ                     
          पुणे दि. 7 :  राजभवन येथे राज्य  सैनिक कल्याण विभागाच्या वतीने  आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या वीरपत्नी उमा व मुलगी उमंग यांच्याशी संवाद साधला.
          यावेळी लेफ्टनंट कर्नल  आर. आर. जाधव,  शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या वीरपत्नी श्रीमती उमा कुणाल गोसावी, मुलगी उमंग कुणाल गोसावी,  नाईक नंदकुमार चावरे,  सुभेदार संजय कुमार मोहिते,  एनसीसी अधिकारी बाळासाहेब शिंदे,  एनसीसी  विद्यार्थी  अमंग रुपेली,  संकेत कदम, विजयश्री सुरदे,  प्रीती जगदाळे आदी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments