सिम्बायोसिस विद्यापीठाचा सोळावा पदवीदान समारंभ संपन्न विद्यार्थ्यांनी देशाच्या उभारणीत योगदान द्यावे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, December 8, 2019

सिम्बायोसिस विद्यापीठाचा सोळावा पदवीदान समारंभ संपन्न विद्यार्थ्यांनी देशाच्या उभारणीत योगदान द्यावे









































सिम्बायोसिस विद्यापीठाचा सोळावा पदवीदान समारंभ संपन्न
विद्यार्थ्यांनी देशाच्या उभारणीत योगदान द्यावे
- उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू

पुणे दि. (विमाका)भारत अनेक शतकांपासून जागतिक ज्ञान केंद्र आहे. आपल्या देशाला तक्षशिला ते नालंदा असा मोठा शैक्षणिक परंपरेचा वारसा लाभला आहे. हा वारसा जोपासत विद्यार्थ्यांनी आपल्या बौद्धिक संपदेचा वापर देशाच्या उभारणीसाठी करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज केले.
लवळे येथे सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या सोळावा पदवीदान समारंभ उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत पार पडलात्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारीमंत्री छगन भुजबळविद्यापीठाचे कुलपती शां. ब. मुजूमदारकुलगुरू रजनी गुप्तेप्र. कुलगुरू तथा प्रधान संचालिका विद्या येरवडेकर,  कुलसचिव एम. जी. शेजूल उपस्थित होते.
उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू म्हणालेशिक्षण घेण्यासाठी जात,‍ लिंगभाषादेश यांची कोणतीही बंधने नसतात. शिक्षणामुळे जगभरातील संधीची दारे उघडली जातात. शिक्षण हे प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव करुन देते. आपल्या देशाला तक्षशिला ते नालंदा असा उज्ज्वल शैक्षणिक वारसा आहे. संपूर्ण आशिया खंडातील विद्यार्थी शिक्षणासाठी भारतात येत होते. हा वसुधैव कुटुंबकम्चा वारसा सिम्बायोसिस विद्यापीठ चालवत आहे. जगभरातील विविध देशांचे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतातही गौरवाची बाब आहे.
उपराष्ट्रपती पुढे म्हणालेपुणे शहर हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. तसेच न्यायमूर्ती रानडेगोपाळ कृष्ण गोखलेगोपाळ गणेश आगरकरलोकमान्य टिळकवासुदेव बळवंत फडके या लोकोत्तर पुरुषांचा वारसा या शहराला लाभला आहे. या शहराशी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही ऋणानुबंध असल्याचे श्री. नायडू यांनी सांगितले.
यावेळी विद्यापीठातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रसिध्द गीतकार जावेद अख्तरशास्त्रज्ञ डॉ. टेसी थॉमस यांना मानद डॉक्टरेट पदवी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली.
यावेळी जावेद अख्तरडॉ. टेसी थॉमस यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शां. ब. मुजूमदार यांनी केले. तर आभार विद्यापीठाच्या प्र. कुलगुरू तथा प्रधान संचालिका विद्या येरवडेकर यांनी मानले.
कार्यक्रमानंतर उपराष्ट्रपती यांच्या हस्ते विद्यापीठाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरपालकशिक्षक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages