स.म. कारखान्यास राज्यस्तरीय वीज संवर्धन पुरस्कार जाहीर
अकलूज (प्रतिनिधी) सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्यास महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण मेढा पुणे या संस्थेकडून २०१८- २०१९ राज्यस्तरीय वीज संवर्धन द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झालेला आहे.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व विद्यमान चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील तसेच सर्व संचालक मंडळ यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कारखान्याची वाटचाल प्रगतीपथावर असून ३३मे. वेट इतक्या को-जनरेशन प्रकल्पाची उभारणी सन २००९-२०१० मध्ये केलेले असून प्रकल्पामधून निर्माण होणाऱ्या विजेचा कारखान्यास व इतर उपपदार्थ प्रकल्पासाठी स्व वापर करण्यात येऊन अतिरिक्त होणारी वीज महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अंदाजे २० मेगावॅट इतकी निर्यात करीत आहे. एम इ आर सी नियमानुसार को- जनरेशन प्रकल्पाचा वीज वापर हा ८.५ टक्के इतका निर्धारित केलेला असल्याने कारखाने वीज बचत करणे करता बॉयलर व टर्नईनचे वर्किंग पॅरामीटर्स डिझाईन नुसार मेंटेन केले आहे तर आवश्यक त्या ठिकाणी एफ डी चा वापर केल्याने को- जनरेशन प्रकल्पाचा स्व वीज वापर हा ६.३० टक्के इतका कमी झालेला आहे. तसेच मिल विभागाकडे ८.५००मे टन कशिंगसाठी एकत्र मिल कार्यरत असलेले त्याठिकाणी पावर सेव्हींग झालेले आहे. बॉयलींग हाऊस कडेही गरजेइतके युनिट चालवले जातात. त्या ठिकाणीही ही व्हीएफडी व प्लॅनेटरी गेअर बॉक्स वापरल्यामुळे विजेची बचत झालेली आहे. दिनांक २१ नोव्हेंबर २०१९ रोजी मेढा ऑफिस पुणे येथे इन्चार्ज को-जन मॅनेजर अभय शिंदे यांनी सादरीकरण केले.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील विद्यमान चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील सर्व संचालक यांचे मार्गदर्शनामुळे खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी यांनी विजेची बचत करण्यामध्ये महत्त्वाचे योगदान दिल्यामुळे राज्य पातळीवर पुरस्कार प्राप्त होण्यास मदत झाले आहे.अशी माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली.
0 Comments