रस्त्यासाठी आलेला निधी गेला कुठे चौकशी करून दोषींवर कारवाई करा;
अकलूज ( प्रतिनिधी ) रस्त्यासाठी आलेला निधी गेला कुठे याची तात्काळ चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी व उत्तम दर्जाचे नवीन रस्ते तयार करावेत अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांन बरोबर भारतीय दलित महासंघाने तहसील कार्यालय समोर करण्यात आलेल्या बोंबाबोंब आंदोलनात करून तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर केले.
सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, माळशिरस तालुक्यातील कन्हेर, गिरवी ,विजयवाडी ,पाणीव कचरेवाडी , मेडद गावाला जाणाऱ्या रस्ते बारा वर्षांपूर्वी डांबरी केलेले आहेत. सध्या हे रस्ते अतिशय खराब झाल्याने वारंवार या रस्त्यावर अपघात होत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे . २८ऑक्टोबर रोजी माळेवाडी याठिकाणी खड्यात मोटरसायकलचे चाक आढळून मधुकर घोडके यांचा अपघाती मृत्यू झाला तर पाठदुखी कंबरदुखी शेतीमाल वेळेवर घेऊन जाता येत नाही, शाळकरी मुलांना वेळेवर शाळेत पोहोचता येत नाही, अशी परिस्थिती असताना अकलूज बांधकाम विभागाने बघ्याची भूमिका घेतली आहे. लाखो रुपयांचा निधी शासनाने पुरवूनही उत्तम दर्जाचे रस्ते न करता निकृष्ट दर्जाचे खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. तात्काळ रस्ते करावे म्हणून संघटनेने २५ नोव्हेंबर रोजी प्रांताधिकारी, तहसीलदार, बांधकाम विभाग, यांच्याकडे निवेदन सादर केले होते. परंतु त्यांनी निवेदनाची अद्याप दखल न घेतल्याने ९ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
सदर निवेदनावरती भारतीय दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादासाहेब लोखंडे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष यशवंत मोहिते, पश्चिम महाराष्ट्र सचिव नानासाहेब कांबळे, तालुका अध्यक्ष आकाश लोखंडे, कार्याध्यक्ष सचिन मिसाळ, नितीन मिसाळ, बापू मिसाळ ,प्रदीप जाधव, रोहित नलावडे, विकास मिसाळ, आप्पा लोखंडे,गोरख लोखंडे ,सोमनाथ मधने, अजित साठे, मुबारक सय्यद, भिसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
भारतीय दलित महासंघाचे बोंबाबोंब आंदोलन मागणी

No comments:
Post a Comment