Hot Posts

6/recent/ticker-posts

आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने दिव्यांग प्रवाशांच्या सेवेसाठी व्हीलचेअर भेट











आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने  दिव्यांग प्रवाशांच्या सेवेसाठी व्हीलचेअर भेट 
 (प्रतिनिधी) - आपुलकी प्रतिष्ठान सांगोला यांच्या वतीने सांगोला बस स्थानकात येणाऱ्या जाणाऱ्या दिव्यांग प्रवाशांच्या सेवेसाठी व्हीलचेअर भेट देण्यात आली.
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सांगोला येथील आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक अपंग  दिनानिमित्त सांगोला बस स्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्या दिव्यांग प्रवाशांच्या सोयीसाठी एक व्हीलचेअर सांगोला बस स्थानकाचे आगार प्रमुख पांडुरंग शिकारे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्य अरविंद केदार, हरीभाऊ जगताप, रमेशअण्णा देशपांडे, बाबुराव लाडे, अरविंद डोंबे, दीपक चोथे, संतोष महिमकर, संदेश पलसे, हमीद शेख, मधुकर कांबळे , राजेंद्र यादव,रमेश देवकर आदी उपस्थित होते.
बसस्थानकातील दिव्यांग प्रवाशांची सोय केल्याबद्दल आगारप्रमुख पांडुरंग शिकारे यांनी आपुलकी प्रतिष्ठानला धन्यवाद दिले.
Reactions

Post a Comment

0 Comments