टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यशस्वीरित्या कार्यरत आहे- डॉ मानसी देवडीकर
अकलूज( प्रतिनिधी) येथील अकलूज फर्टिलिटी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरला एक वर्ष पूर्ण झाले असून ग्रामीण भागातील हे टेस्ट ट्युब बेबी सेंटर डॉ. विनोद शेटे, डॉ. सचिन गवळी व डॉ. रेवती राणे यांच्या सहकार्यातून यशस्वीरीत्या कार्यरत असल्याची माहिती डॉक्टर मानसी देवडीकर यांनी दैनिक कटूसत्य प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की आज पर्यंत त्या सेंटरमध्ये बाह्यरुग्ण विभागात ३ हजार पेशंटचे वंध्यत्व चिकित्सा व त्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.तर कृत्रिम विर्यारोपण( आय युव आय) पद्धतीचा १८७ जोडप्यांनी याचा लाभ घेतला आहे. तर १०८जोडप्यांनवर टेस्ट ट्यूब बेबी पद्धतीने उपचार करण्यात आले आहे .यामध्ये सर्वसाधारण ६० टक्के जोडप्यांना यशस्वीरित्या गर्भधारणा झाली असल्याचेही डॉ.मानसी देवडीकर यांनी सांगितले.

0 Comments