Hot Posts

6/recent/ticker-posts

अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या प्रदेशाध्यक्ष पदी सुधाकर महाराज इंगळे तर सचिव पदी आण्णा महाराज बोधले

अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या प्रदेशाध्यक्ष पदी सुधाकर महाराज इंगळे तर सचिव पदी आण्णा महाराज बोधले
        
सोलापूर : अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय वारकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. प्रकाश महाराज बोधले (राष्ट्रीय अध्यक्ष) हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. मंडळाच्या कार्याचा राज्यभरात विस्तार वाढावा यासाठी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदी ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे व सचिव पदी ह.भ.प.आण्णा महाराज बोधले यांची ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले (राष्ट्रीय अध्यक्ष) यांनी नियुक्ती केली. तसेच संपर्क प्रमुख म्हणून ह.भ.प.समाधान महाराज बोंबले, सदस्य ह.भ.प भारत महाराज कोकाटे, ह.भ.प श्रीपाद महाराज भडंगे यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलेला असुन पिढ्यान पिढ्या भाविकांनी जोपासलेला आहे.
           अठरापगड जातीच्या लोकांना घेऊन जाणारा वारकरी संप्रदाय एकसंघ करण्यासाठी संघटनेची गरज असल्यामुळे मंडळाच्या राज्य कार्यकारिणीची  नियुक्ती करण्यात आली आहे.

                  वाढावया सुख भक्तीभाव धर्म | कुळाचारी नाम विठोबाचे||

    संप्रदायाचा प्रचार-प्रसारात वाढ करण्यासाठी ह.भ.प सुधाकर महाराज इंगळे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे ह भ प प्रकाश महाराज यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विचार व्यक्त केले. त्यामुळे राज्यभरातून सुधाकर इंगळे महाराजांवर वारकरी सांप्रदायातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments