Hot Posts

6/recent/ticker-posts

हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर

हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर 


हैदराबाद - हैदराबादमध्ये २७ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले आहे. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला आहे.
                         पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तपासावेळी आरोपींना घटनास्थळी घेऊन गेले होते. त्यावेळी पोलिसांच्या तावडीतून हे आरोपींनी निसटण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही ते पळून जात होते. अखेर पोलिसांनी गोळीबारी केली. त्यात या चारही आरोपींचा मृत्यू झाला आहे.
                   हैदरबाद बलात्कार पीडितेचे जळालेल्या मृतदेहाचे फोटो पाहून संपूर्ण देश हादरला होता. याप्रकरणी सायबराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली होती.  पीडितीच्या हत्याप्रकरणी पोस्ट मार्टम अहवालातून धक्कादायक खुलासा समोर आला होता. 
Reactions

Post a Comment

0 Comments