आ.बबनदादा शिंदे यांच्या पाठीशी राहून सर्वोतोपरी सहकार्य करणार- संजय पाटील भिमानगरकर.
-------------------------------------प्रतिनिधी- (विजय चव्हाण) माढ्याचे विकासप्रिय आमदार बबनदादा शिंदे यांच्या लोकोपयोगी कामामुळे प्रभावित होऊन यापुढे बबनदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन जि.प.चे माजी कृषी सभापती संजय पाटील-भिमानगर यांनी केले आहे.
पुढे बोलताना संजय पाटील म्हणाले की, आ.बबनदादांनी शेतक-यांना उभारणीचे कार्य केले आहे.सिना- माढा उपसासिंचन योजना, भिमा-सिना जोडकालवा या योजना कार्यान्वीत झाल्या, शेतक-यांच्या आशा-आकांक्षा उंचावल्या गेल्या व सर्वत्र ऊसाची मोठ्या प्रमाणावर लागण होऊ लागली, बबनदादांनी पिंपळनेर येथे विठ्ठलराव शिंदे कारखाना उभा केला व तो आज राज्यात एक नंबरचा यशस्वी कारखाना म्हणून औळखला जातो. कारखान्यामार्फत खते, बेणे व मार्गदर्शन देऊन ऊसाला चांगला भाव दिला आहे. यामुळे शेतक-यांचे जीवनमान उंचावले आहे. या व्यतिरिक्त मतदारसंघातील रस्ते,वीज, शिक्षण,आरोग्य याकडेही बबनदादांनी पुरेपुर लक्ष दिले आहे. बबनदादांचे कार्य मोठे आहे व ते करत असताना त्यांनी कधीही गट-तट-पक्ष-राजकारण पाहीलेले नाही. विकास कामाचा दृष्टीकोन समोर ठेऊनच दादा कार्य करत आहेत व यामुळेचे सर्व कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून, एकविचाराने यापुढे बबनदादांच्या पाठीशी राहून त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचा निर्णय घेतलेला आहे, असे पाटील यांनी आवर्जून सांगितले.
सध्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आ.बबनदादांचे समोर उभा असलेला विरोधी उमेदवार सकाळी भाजपाचा तालुका अध्यक्ष तर दुपारी शिवसेनेचा उमेदवार झाला आहे. बबनदादा म्हणजे विकास तर विरोधी उमेदवार भकास आहे. दोघांची तुलनाच होऊ शकत नाही. विधानसेभची सध्याची निवडणूक महत्वाची आहे. दबावाचे राजकारण सर्वत्र चालू आहे. परंतु विकासाचा दृष्टीकोन समोर ठेऊन बबनदादांना मतदान करा असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment