आज दि. ३०/०९/२०१९ रोजी अन्न व औषध प्रशासन व सोलापूर तालुका पोलिस स्टेशन यांनी केलेल्या संयुक्त कारवाई मध्ये पाकणी शिवार येथील गट नंबर. ३६४/४/अ येथील शिवप्रसाद उर्फ अमर नारायण भोसले रा. कोंडी, ता. उत्तर सोलापूर यांच्या मोकळ्या खोलीची पोलीस व पंचांसमक्ष तपासणी केली असता त्यात SGR 2000 या गुटख्याचा ३०० बॅगा अंदाजे किंमत १९,५०,०००/- विक्री हेतू साठविल्याचे आढळले तर याबाबत जागा मालक यास चौकशी केली असता सदर माल ईस्माईल मुल्ला रा. भवानी पेठ, सोलापूर याने कुरिअर चा माल असून दोन दिवस ठेवण्याच्या अटीवर ठेवला होता. सदर साठ्यामधून औपचारिक अन्न नमुने घेऊन उर्वरित साठा जप्त करण्यात आला व वर नमूद दोन्ही आरोपींविरुद्ध सोलापूर तालुका पोलिस स्टेशन येथे भादंवि २७२,२७३ व अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कलम ५९ नुसार फिर्याद देण्यात आली आहे.


0 Comments