साेलापूर ( प्रतिनिधी):- सोलापुरातील युनियन बँक शाखा गांधिनगर येथे ऐमन युसूफ शेख या विद्यार्थ्यांचे बँक खाते असून या बँक खात्यावर शिष्यवृत्तीचे 30 हजार रुपये बँक खात्यावर जमा झाले होते. सदरच्या विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकाने सदरची रक्कम बँकेतून काढण्यासाठी गेल्या असता सदरची रक्कम यापूर्वीच तसेच दुसर्या नावाच्या खातेदाराने एटीएमच्या सह्य्याने काढली गेली असल्याची माहिती बँकेत मिळाली पालक आणि विद्यार्थी चक्रावून गेले आणि त्यांनी आम्ही बँकेतून पैसे काढले नाही अशी विनंती करून सदरचे पैसे मिळावे म्हणून प्रयत्न करत होते याबाबत सदरचे प्रश्न सुटत नसल्याचे लक्षात येताच पालकाने थेट प्रहार संघटनेचे संपर्क प्रमुख जमीर शेख यांचेशी संपर्क साधला आणि त्याठिकाणी प्रहारची टीम पोहोचली आणि शाखा अधिकाऱ्याला फैलावर घेत जाब विचारला आणि त्या विद्यार्थिनीला तातडीने तातडीने त्याच्या खात्यावरील 30 हजार रुपये देण्याची मागणी केली शाखाधिकारी घोडगे यांनी सदरचे प्रकरण तपासून विद्यार्थिनीला दोन दिवसाच्या आत त्याचे पैसे परत मिळवून देण्याची हमी दिल्याने बँकेवर होणारे आंदोलन प्रहार ने थांबवले.
यावेळी विद्यार्थिनी चे वडील युसुफ शेख,प्रहारचे दक्षिण तालुका कार्याध्यक्ष सिध्दाराम काळे, रमेश कुंभार,विजय वाघमारे, सुनिल काळे,मरेप्पा अंबेवाले, अय्युब शेख,बक्तीयार शेख,माैला नदाफ,फिराेज शेख आदी उपस्थित हाेते.
0 Comments