आ.प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल होणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 23, 2019

आ.प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल होणार

Image result for praniti shinde
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मतदारांना आकर्षित करण्यासाठी मेकअप बॉक्सचे वाटप केल्याप्रकरणी प्रणितीताई शिंदे यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

 माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी तक्रार दाखल केली होती़ २१ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. त्याचवेळी आचारसंहितेचा अंमल लागू झाल्याचे जाहीर केले होते़ त्यानंतर काँग्रसचे कार्यकर्ते शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील विडी घरकूल परिसरात मेकअप बॉक्सचे वाटप केल्याची पुराव्यानिशी तक्रार एका महिलेने माजी आमदार आडम मास्तर यांच्याकडे केली होती़ त्यानुसार आडम मास्तर यांनी मेकअप बॉक्ससह जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे लेखी तक्रार केली.
आमदार प्रणिती शिंदे यांचा खुलासा घेतला त्यांनी गणेशोत्सवात मेकअप बॉक्स वाटप केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे पण विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर तक्रार आल्याने याची शहानिशा होण्यासाठी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांनी सांगितले. याबाबत पोलीस तपास करून पुढील बाबी स्पष्ट करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकायांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages