शरद पवारांबद्दलच्या प्रश्नावर उदयनराजे झाले भावुक डोळ्यातून आले पाणी.. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 24, 2019

शरद पवारांबद्दलच्या प्रश्नावर उदयनराजे झाले भावुक डोळ्यातून आले पाणी..

Image result for udayanraje

सातारा : उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला. मात्र, त्या प्रश्नावर उदयनराजे भावनिक झाले आणि त्यांच्या डोळ्यांत पाणी आले..

साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर उदयनराजे लोकसभेत निवडून आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेससह खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यभरात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. प्रवेशानंतर भाजपच्या काही सभेतही उदयनराजे दिसले होते. मात्र, त्यानंतर आता उदयनराजे भोसले यांना शरद पवार यांच्याबाबत विचारले असता त्यांच्या डोळ्यांत पाणी आलेते म्हणाले,
शरद पवार मला वडिलांच्या स्थानी आहेत. लोकसभेसाठी शरद पवार उभे राहिले तर मी उभा राहणार नाही. पवारसाहेबांनी फक्त त्यांचा दिल्लीतील बंगला आणि गाडी मला वापरायला द्यावी..

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages