एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या.. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 24, 2019

एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या..


Image result for suicide

सोलापूर - अलिपूर येथे एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट असून ज्ञानेश्वर मठ येथील कोकाटे कुटुंबीयांत ही दु:खद घटना घडली. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. आपल्या मुलांना विष पाजून आई-वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात येत आहे.

शहरातील अलिपूर रोड परिसरातील ज्ञानेश्वर मठ जवळील भैरवनाथ शिवाजी कोकाटे यांनी आपल्या कुटुंबासमवेत आत्महत्या केली. मृतांमध्ये चार जणांचा समावेश आहे. भैरवनाथ शिवाजी कोकाटे (40), मनिषा भैरवनाथ कोकाटे (36), प्रशांत कोकाटे (15), आणि प्रतिक्षा कोकाटे (11) अशी मृतांची नावे आहेत. भरदिवसा ही घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली असून शेजारील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच पोलीस आणि स्थानिकही घटनास्थळी पोहोचले आहेत. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून संपूर्ण शहरात दुःखाचे वातावरण आहे. नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages