भारत- पाकिस्तानच्या सीमारेषेवर भूकंपाचे मोठे धक्के 5 जणांचा मृत्यू तर 50जखमी. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 24, 2019

भारत- पाकिस्तानच्या सीमारेषेवर भूकंपाचे मोठे धक्के 5 जणांचा मृत्यू तर 50जखमी.

भारत- पाकिस्तानच्या सीमारेषेवर भूकंपाचे मोठे धक्के . तसेच दिल्ली आणि उत्तर भारतात देखील भूकंपाचे धक्के बसले आहे. अचानक आलेल्या भूकंपाच्या धक्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमधील मीरपूर येथे 5 जणांचा मृत्यू तर 50 नागरिक जखमी झाल्याचे समजते आहे. या भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भूकंपाचे धक्के बसल्याने तेथील स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 एनसीआरसह उत्तर भारतातील हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश या ठिकाणी आज (मंगळवारी) दुपारी 4 वाजून 31 मिनिटाच्या आसपास भूकंपाचे धक्के बसले आहे. त्याचप्रमाणे या भूकंपाचा केंद्रबिंदू पाकिस्तानमधील रावळपिंडीमद्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच प्राथमिक माहितीनूसार काश्मीरमधील राजौरी, पुंछ, जम्मू, उधमपूर आणि रामबनमधील काही भागात भूकंपाचे धक्के बसल्याचे नागरिकांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages