मित्राच्या आनंदासाठी गर्व न बाळगता भाजीविक्रीच्या स्टाॅलवर बसणारे डाॅ संदिप भाजीभाकरे* - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 25, 2019

मित्राच्या आनंदासाठी गर्व न बाळगता भाजीविक्रीच्या स्टाॅलवर बसणारे डाॅ संदिप भाजीभाकरे*



मित्राच्या आनंदासाठी गर्व न बाळगता भाजीविक्रीच्या स्टाॅलवर बसणारे डाॅ संदिप भाजीभाकरे

कडक तेवढेच संवदेनशील अधिकारी तथा संपुर्ण सोलापूर जिल्ह्यातील युवकांसाठी आयडाॅल म्हणुन ज्यांच्याकडे पाहिले जाते ते म्हणजे मुबंईचे पोलिस उपायुक्त डाॅ संदिप भाजीभाकरे. पोलिस दलात उच्च पदावर विराजमान असुन देखील गावाकडे आल्यावर लहानापासुन थोरापर्यंत सर्वाशी आपुलकीने बोलुन त्यांना आपलेसे करणे. त्यामुळे डाॅ संदिप भाजीभाकरे यांना सर्व गावकरी प्रेमाने भैय्या म्हणतात. हे भैय्या देखील गावाकडे आल्यावर सर्वांच्या सुख:दुखात सामिल असतात. त्यामुळे डाॅ संदिप भैय्यांचा मित्र परिवार खुप मोठा आहे. गावाकडे आल्यावर त्यांच्या घरी मित्रमंडळीची एवढी गर्दी असते की, कौटुंबिक चर्चा करायला सुध्दा त्यांना कधी-कधी वेळ मिळत नाही. त्यामुळे मला नेहमी प्रश्न पडायचा भैय्यासाहेबांचा एवढा मित्रपरिवार कसा? ते एवढे मित्र परिवार कसे तयार करतात.? कारण माणुस अधिकारी झाला की, नोकरीच्या कामातून वेळ मिळत नाही. परिणामी गावाशी असलेली गावाशी असलेली नाळ तुटते. त्यामुळे मित्रपरिवारही दुर होतो. परंतु भैय्यासाहेबांचा याउलट सगळे होते. ते गावात आले की माघारी ड्युटीवर जाईपर्यंत त्यांच्या कडेने मित्रपरिवारांचा घोळका हटत नाही. मला जो नेहमी प्रश्न पडायचा की, भैय्यां एवढे मित्र कसे सांभाळतात याचा प्रत्यक्ष अनुभव गावातच पहायला मिळाला.
शनिवारी डाॅ संदिप भैय्या गावाकडे आले होते. त्यामुळे नेहमीप्रमाणे रात्रीच्या वेळी ते मित्र परिवारांसोबत गावातील चौकात फेरफटका मारण्यासाठी आले. भैय्या चौकात आले म्हटले की चौकातील एक-एक करत बरेचसे लोक व वर्गमित्र भैय्यांजवळ येऊन गप्पा मारू लागले. गप्पांची चांगली मैफील रंगली होती. अचानक त्यांची नजर चौकात बसलेल्या भाजीविक्रेत्याकडे गेली. त्यांनी त्या मैफीलीतुन पाय काढत सरळ थेट त्या भाजीविक्रेत्याकडे गेले. भाजीविक्रेताला पाहताच त्यांना आनंद झाला कारण तो भाजीविक्रेता हा डाॅ संदिप भैय्यांचा वर्गमित्र होता. पण हा मित्र काही वर्षापुर्वी दारूच्या एवढा आहारी गेला होता की आज मरतो की उद्या अशी परिस्थिती झाली होती. परंतु त्या व्यसनातुन बाहेर पडत त्याने या व्यवसायात चांगली भरारी घेतली होती. याबाबत नुकतीच 'सकाळ' या दैनिकात त्यांची बातमीही प्रसिध्द झाले होती. एवढ्या मित्रपरिवारांची समोर गर्दी असताना देखील भैय्यांना त्या मित्राचा भुतकाळ आठवला व त्याची आजची परिस्थिती पाहुन आनंद झाल्याने क्षणाचाही विचार न करता त्या मित्राचे अभिनंदन करण्यासाठी व प्रेरणा देण्यासाठी त्या मित्राच्या भाजीविक्रीच्या स्टाॅलवरून जाऊन बसले. त्यामुळे त्या मित्रालाही आनंद गगनात मावेनासा झाला. भैय्यांनी त्या मित्राशी जवळ बसुन विचारपूस करत अशीच भरारी घे म्हणत प्रोत्साहन दिले. त्या भाजीविक्रेत्यांसाठी हि मोठी अभिमानाची गोष्ट होती कारण त्याच्यासोबत भाजीविक्रीसाठी चक्क पोलिस उपायुक्त बसले होते. त्याला विश्वासच बसत नव्हता. भैय्यांचा हि घटना मी जवळुन पाहत होतो. त्यामुळे उच्च पदावर विराजमान असुन देखील भैय्या त्यांच्या मित्रांची किती काळजी घेतात. कशा प्रकारे ते मित्रांना प्रोत्साहन देतात पहायला मिळाले. नाहीतर मनात सहज विचार येऊन गेला की, एखादा अधिकारी असता तर म्हणला असता मी एवढा मोठा अधिकारी आहे. त्याला बोलायची गरज असेल तर येईल उठुन मला भेटायला एवढे लोक सोडून मी का जाऊ त्याच्याकडे. पण भैय्यांनी कोणताही गर्व न बाळगता थेट भाजीविक्रेत्या जवळ जाऊन बसत मैत्रीचा आदर्श घालुन दिला. पद, प्रतिष्ठा, पैसा यापेक्षा मैत्री महत्त्वाची असते. ती सांभाळताना कधीही कसलाही गर्व बाळगयाचा नसतो याचा एक आदर्श घालून दिला. मोठे होण्यासाठी पैश्या-पाण्याने अथवा पदांने मोठे होता येत नाही. तर आपल्या बरोबर असणार्यां लहानातील लहान व्यक्तीला गरीब असल्याची जाणीव होऊ देत नाही ते व्यक्तीमत्त खरे मोठे असते याचा प्रत्यय आला.
*ग्रेट भैय्यासाहेब.....

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages