मंगळवेढ्यात रहस्यमय आवाज ;नागरिक भयभीत... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, September 19, 2019

मंगळवेढ्यात रहस्यमय आवाज ;नागरिक भयभीत...

मंगळवेढ्यात रहस्यमय आवाज ;नागरिक भयभीत...


मंगळवेढा शहरासह जवळपासची खेडी व इतर काही तालुक्यात गुरुवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास रहस्यमय आवाजाने हादरली. भयभीत नागरिकांनी रस्त्यावर धाव घेतली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.
आज सकाळी मंगळवेढा शहर आणि आजूबाजूच्या खेड्यांमध्ये दैनंदिनं काम सुरू झाली आणि साधारण १०.१५ मिनिटांनी अचानक झालेल्या रहस्यमय आवाजाने मंगळवेढा तालुका हादरला. मंगळवेढा शहरासह जवळपासची खेडी ही या आवाजाने हादरून गेली, खिडक्यांच्या काचाचा थरकाप प्रकर्षाने जाणवला. काय झाले या भीतीने प्रत्येकजण घरा बाहेर पडत होते, नेमका प्रकार जाणून घेण्यासाठी एकमेकांना संपर्क करू लागले. मात्र कुणाकडेच याची माहिती मिळत नव्हती.
मंगळवेढा तालुक्यात रहस्यमय आवाज नवे नाहीत. पण गेल्या काही महिन्यांपासून असे आवाज होणे बंद झाले होते.हाच आवाज गेली वर्षी १२ नोव्हेंबर रोजी व चालू वर्षीही आला होता.गेल्या दोन तीन वर्षांपासून अधूनमधून असे आवाज येण्याच्या घटना सुरू आहेत. 
काही ठिकाणी हादऱ्याने घड्याळं, भांडी, कपाटं खाली पडली तर खिडक्या, दरवाज्यांचा देखील झटक्याने आवाज झाल्याचे नागरिकांनी सांगितले. आवाज होऊन जोरदार झटका बसल्याने भूकंप झाल्याच्या भीतीने नागरिक घराबाहेर पडले. या रहस्यमयआवाजाने नागरिकांच्या मनात घर केले आहे.रहस्यमयआवाजाने जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र या रहस्यमय आवाजाची अद्याप पर्यंत प्रशासनाकडे कोणतीच माहिती उपलब्ध नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages