'मध्य' मधून ओव्हरटेक न करण्याच्या दिलीप मानेंच्या वक्तव्याची चर्चा ...
आपला शिवसेना प्रवेश झाला असला तरी सोलापूर शहर मध्य मधून निवडणूक लढविण्याच्या पार्श्वभूमीवर येथील इच्छुक उमेदवार महेश कोठे याना आपण ओव्हरटेक करणार नाही असे वक्तव्य दिलीप माने यांनी केले आहे या वक्तव्याची मोठी चर्चा महेश कोठे गटात सुरु आहे. दरम्यान दिलीप माने यांनी जरी असे वक्तव्य केले असले तरी त्यात तथ्य नसून माने हे मध्य मधूनच शिवसेनेच्या तिकिटावर लढतील हे नक्की आहे अशाही चर्चेचा सूर शिवसेनेच्या गोटासह सोलापूरच्या राजकीय वर्तुळात आहे. तथापि मध्य मधून माने की कोठे ? याचा फैसला अवघ्या चार दिवसातच होऊ शकतो. 'मातोश्री वरून' विधानसभेच्या उमेदवारीची यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे. अशी माहिती मातोश्री वरून सूत्रांनी दिली.
0 Comments