Hot Posts

6/recent/ticker-posts

गणपतीच्या सजावटीची तयारी करत असताना शॉक लागून मृत्यू.

साबळेवाडी (सातारा ) : गणपतीच्या सजावटीची तयारी करत असताना शॉक लागून हणमंत मुगुटराव साबळे (वय 55, रा. साबळेवाडी, ता. सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास घडली..गणेशाच्या आगमनाची सध्या घरा-घरात जय्यत तयारी सुरू आहे. साबळेवाडीतील हणमंत साबळे हे सुद्धा आपल्या घरात शनिवारी रात्री गणेश मूर्तीसाठी सजावट करत होते. यावेळी अचानक त्यांना विजेचा धक्का बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते बेशुद्ध पडल्याचे समजून कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. 
Reactions

Post a Comment

0 Comments