भाजपच्या प्रवेशाची समीप आली घटिका.. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, September 20, 2019

भाजपच्या प्रवेशाची समीप आली घटिका..


Image result for mhetre bhalke babandada
भाजप पक्ष प्रवेशासाठी वेटिंगवर राहिलेले पंढरपूर-मंगळवेढ्याचे भारत भालके , अक्कलकोटचे सिध्दाराम म्हेत्रे आणि माढ्याचे बबनदादा शिंदे या तिन्ही आमदारांची आता प्रतीक्षा संपली असून आज शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा देऊन ते शनिवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
राष्ट्रवादीला गळती लागल्याने राज्यभरात भाजप - शिवसेनेत प्रवेशासाठी मेगाभरती होत असताना पंढरपूर मंगळवेढ्याचे काँग्रेसचे आमदार भालके,अक्कलकोटचे काँग्रेसचे आमदार म्हेत्रे आणि माढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिंदे यांना भाजप पक्ष नेतृत्वाने वेटिंगवर ठेवले होते.
गेल्या काही दिवसांपासून या तिन्ही आमदारांनी भाजपमध्ये प्रवेशासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महसूलमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,जलसंपदामंत्री गिरीश महाजन आदी नेत्यांच्या भेटी घेतल्याचे सांगितले जाते. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असून या तिन्ही नेत्यांना पक्ष प्रवेश दिल्यास पक्षांमध्ये कोणी बंडाचे निशाण फडकावून नये , यासाठी त्यांना ' वेट अँड वाँच राहा'असे सांगण्यात आले होते.
राष्ट्रवादीच्या आमदारांना भाजपमध्ये प्रवेश देऊन सोलापूर जिल्हा काँग्रेस आघाडीमुक्त करण्याचा संकल्प भाजपने केल्याचे दिसून येते .
शिवसेना - भाजपची युती झाली तरी निवडणुकीमध्ये जास्तीत - जास्त भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे जोरदार प्रयत्न चालू आहेत . काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यातील मतदारसंघ भाजपकडे खेचण्यासाठी त्यांची ही रणनिती असल्याचे स्पष्ट होते. आज शुक्रवारी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे म्हेत्रे,भालके,बबनदादा हे राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे राजकीय गोटातून समजते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages