Hot Posts

6/recent/ticker-posts

पाणी फाउंडेशन कामांमध्ये महिलांचा ही सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे ः आ.भालके

मंगळवेढा (प्रतिनिधी)ः पाणी फाउंडेशनचे हे काम हे राजकारण विरहीत झालं पाहिजे .सर्वांनी मिळून ,एकत्र येऊन हे काम केले पाहिजे ,कारण या कामातून आपण पुढच्या तीन पिढ्यांच्या पाण्याची सोय करणार आहोत .या पाणी फाउंडेशन कामांमध्ये महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. महिला हे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने करू शकतात .गावातील लोकांना समजून सांगण्याची भूमिका महिलांकडून उत्कृष्ट पद्धतीने पार पाडली जाऊ शकते .आपल्या कामामध्ये आपला आत्मविश्वास पाहिजे शासकीय कामाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा केला पाहिजे आता इथून पुढे सभामंडप ,समाज मंदिर याहीपेक्षा पाणी, वाचनालय, व्यायामशाळा यांना प्राधान्य देऊन अशा स्वरूपाची कामं केली पाहिजेत.
 पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेमध्ये भाग घेणार्‍या गावांसाठी मी माझ्या आमदार निधीतून ५०हजार रुपये देणार आहे असे वचन भारत भालके यांनी केले ते सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१७-१८ प्रशिक्षण ,मार्गदर्शन व आढावा बैठकीत ते बोलत होते श्री संत दामाजी महाविद्यालय व भारतीय जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होतापाणी फाउंडेशनच्या कामांमध्ये नुसता सहभाग घेणे उपयोगाचे नाही तर प्रत्यक्ष काम केल करणे महत्त्वाचे आहे .राजकारणातील , आपापसातील मतभेद विसरून ,हातात हात घालून, गावाच्या विकासासाठी पाणी फाउंडेशन मध्ये काम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे ,यासाठी या कामातील युवकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे कारण वाहत्या पाण्याला चालायला शिकवलय पाहिजे ,चालत्या पाण्याला थांबवलायला शिकवल पाहिजे ,चालत्या पाण्याला थांबवलायला शिकवले पाहिजे आणि थांबलेल्या पाण्याला जिरवायला शिकलं पाहिजे हेच पाणी  फाउंडेशनचे काम आहे.भारतीय जैन संघटनेच्या पाणी फाउंडेशनच्या कामातील योगदान फार महत्त्वाचे आहे . कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविकामध्ये रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा यांनी पाणी फाउंडेशनच्या कामातील भारतीय जैन संघटना यांच्या भूमिका सांगितना म्हणाले की या पाणी फाउंडेशनच्या कामात भारतीय जैन संघटना जेशीबी मशीनचा पुरवठा करणार असून इतर सहकार्य करण्याची भूमिका सांगितली यावेळी जुंधळे ,हेंबाडे, शोभा काळूंगे , मंगळवेढा तालुका कृषी अधिकारी गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले सत्यवान देशमुख यांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१७-१८या संदर्भात प्रशिक्षण ,मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा एन आर जगताप यांनी केले यावेळी नगराध्यक्षा अरूना माळी, प्राचार्य .डॉ .एन बी पवार ,डॉ आप्पासाहेब पुजारी,पत्रकार समाधान फुगारे व तालुक्यातील १० गावचे सरपंच उपसरपंच पाणी फाउंडेशनचे प्रदर्शिनार्थी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments