अक्कलकोट (प्रतिनिधी)ः प्रत्येक व्यक्तीमध्ये देवत्वाचा अंश आहे. संत कधीच कुठल्याही प्रसिद्धीच्या मागे लागत नाहीत. म्हणून संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचवून समाजाची सेवा करणे हे आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी केले.
अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरात धर्मसंकीर्तन महोत्सवानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावर्षी श्री स्वामी चरण प्रसाद पुरस्कार सोलापूरचे ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांना व पुण्याचे स्वामीभक्त वीरेंद्र किराड (पुणे) यांना प्रदान करण्यात आला. सद्गुरु ह.भ.प. बाळासाहेब महाराज देहूकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.
मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले, ह.भ.प. भागवत महाराज चवरे (पंढरपूर) यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी धर्मसंकीर्तनाचे संयोजक डॉ. हेरंबराज पाठक यांनी स्वामी चरण प्रसाद पुरस्काराचे वाचन व प्रास्ताविक केले.
पुढे बोलताना सुधाकर महाराज इंगळे म्हणाले, हा पुरस्कार संतांचा कृपाप्रसाद आहे. यापुढे देखील आयुष्यातील प्रत्येक क्षण संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचवून त्यांच्या विचारांच्या सेवेत आपले जीवन समर्पित करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. समाजास आदर्श जीवन जगण्यासाठी अध्यात्म हा मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना वीरेंद्र किराड यांनी आजचा दिवस माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याचे सांगितले.
पुरस्कार वितरण कार्यक्रमास स्वाती किराड, अनंत महाराज इंगळे, बळीराम जांभळे, ज्योतीराम चांगभले, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त विलासराव फुटाणे, महेश गोगी, संपतराव शिंदे, उज्वलाताई सरदेशमुख, दयानंद हिरेमठ, शंकर पवार, विजयकुमार कडगंची, ह.भ.प. आबा महाराज पाटील, ह.भ.प. काशीनाथ गुरव आदींसह तालुक्यातील व सोलापूर, पुणे येथील वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments