Hot Posts

6/recent/ticker-posts

संजिता चानूने 192 किलो वजन उचललं, भारताला दुसरं सुवर्ण

सिडनी : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली. संजिता चानूने महिला वेटलिफ्टिंगच्या 53 किलो वजनी गटात भारतासाठी दुसरं सुवर्ण मिळवलं. संजिता चानू ही मूळ मणिपूरची आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत दोन सुवर्ण आणि एका रौप्य पदकासह तीन पदकांची कमाई केली.
CWG 2018 : संजिता चानूने 192 किलो वजन उचललं, भारताला दुसरं सुवर्ण
संजिता चानूने 192 किलो किलो वजन उचलत भारताला सुवर्ण मिळवून दिलं, जो एक विश्वविक्रम आहे.

ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये 21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत यापूर्वी वेटलिफ्टिंगमध्ये 48 किलो वजनी गटात मीराबाई चानूने सुवर्ण पदक मिळवलं होतं. वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने महिलांच्या 48 किलो वजनी गटात 196 किलो वजन उचललं.

वेटलिफ्टर गुरुराजाने पुरुषांच्या 56 किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करुन भारताचं पदकांचं खातं उघडलं होतं. त्यापाठोपाठ मीराबाई चानूने सुवर्णपदक पटकावून चार चांद लावले. त्यापाठोपाठ आता भारताने दुसरं सुवर्ण पदकही मिळवलं.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची बॅडमिंटनमध्ये विजयी सुरुवात झाली. सांघिक बॅडमिंटनमध्ये भारतीय संघाने श्रीलंकेचा 5-0 ने धुव्वा उडवला. दुसरीकडे भारतीय महिला हॉकी संघाला पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं.

गेल्या चार स्पर्धांमधील भारताची कामगिरी

भारतीय खेळाडूंची गेल्या चार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधली कामगिरी ही लक्षवेधक ठरली होती. त्यामुळे यंदा गोल्ड कोस्टच्या समुद्रमंथनातूनही भारताला पदकांची मोठी अपेक्षा आहे.

2002... मॅन्चेस्टर... 69 पदकं, 2006... मेलबर्न... 50 पदकं, 2010... दिल्ली... 101 पदकं, 2014... ग्लास्गो... 64 पदकं आणि आता 2018 सालच्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज झालंय 225 शिलेदारांचं भारतीय पथक.
Reactions

Post a Comment

0 Comments