Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूरच्या दोन उंदरांनी शहर व जिल्हा कुरतडून खाल्ला ः मुंडे

सोलापूर शहर व जिल्ह्याला काहीही देण्याची दानत या सरकारकडे नाही ः अजित पवार

सोलापूर (प्रतिनिधी) ः सोलापूर हे कापड उद्योगातील महत्त्वाचे शहर आहे. यंत्रमागधारकांचे शहर आहे. पण सोलापूरचा कापड व्यवसाय आता बंद झालेला आहे. या व्यवसायामुळे महाराष्ट्र जगात ओळखला जातो. पण हा उद्योग शेजारच्या राज्याने बळकावला आहे. तरीही सोलापूरला काहीही देण्याची दानत या सरकारकडे नाही, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री व विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केला.  पवार हे सोलापूर येथील नार्थकोट मैदावर हल्लाबोल आंदोलनातील सभेत ते बोलत होते. या सभेला खा.विजयसिंह मोहिते पाटील, आ.ऍड. जयदेव गायकवाड  आ.प्रमोद हिंदुराव, आ.हनुमंत डोळस, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार राजन पाटील, जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, राष्ट्रवादी सोलापूर जिल्हा निरीक्षक प्रदिप गारडकर, ओबीसी सेलचे राज्यप्रमुख ईश्वर बाळबुधे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, शहरअध्यक्ष भारत जाधव,  जिल्हा कार्याध्यक्ष संतोष पवार, गटनेते किसन जाधव, नगरसेवक नागेश गायकवाड, महिलाअध्यक्ष सुनिता रोटे, नगरसेविका सुवर्ण जाधव आणि पक्षाचे अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना विधिमंडळ पक्षनेते अजित पवार म्हणाले की, या सरकारने मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटीक महाराष्ट्र यासाठी करोडो रुपये खर्च केले. उद्घाटने झाली. पण पुढे काही नाही. कर्नाटक राज्यात स्वस्त दरात पेट्रोल मिळत आहे. मग महाराष्ट्रावर अन्याय का ? केंद्रात भाजपला निवडून दिले, म्हणून हा अन्याय होत आहे का? आज सोलापूरला ६ ते ७ दिवसांआड पाणी मिळते. भरपूर पाणी असताना सोलापूरवर अन्याय कशाला? सरकार बुलेट ट्रेनवर खर्च करत आहे. त्याची गरज काय? हा पैसा जर सोलापूरच्या विकासासाठी व पाण्यासाठी वापरला गेला असता, तर लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व युवकांच्या बेरोजगरीचा आणि कामगारांचा प्रश्‍न सुटला असता ही आरोप करुन हे सरकार सर्व सामान्यांच्या जीवावर उठले आहे. या पुढील काळात सोलापूकरांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठीशीय उभे राहवे असेही आवाहन अजित पवार यांनी केले.
शेतकरी हैराण आहेत. जर बुलेट ट्रेन आली, तर त्यांच्या जमिनी जातील. मग ते पुढे काय करणार? हा प्रश्न त्यांना सतावत आहे. निरव मोदी पैसे घेऊन पळाला आरबीआय काय करत होती. ज्या बँकानी पैसे दिले, त्यांनी काही कसे केले नाही? शेतकर्‍यांचा प्रचंड मोठा मोर्चा आला होता. या सरकारने त्यांना काहीच दिले नाही. अंगणवाडी सेविका, विद्यार्थी, युवक सर्वच या सरकारवर नाराज आहे. सरकारकडून काहीच उत्तर मिळत नाही, असेही पवार म्हणाले.
सोलापूरची ओळख खराब करण्याचे काम पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख करत आहेत. दोघेही भांडणे करून सोलापूरच्या विकासाला आडकाठी करत आहेत. त्यामुळे सोलापूरकरांनी न्याय कुणाला मागावा हा प्रश्न उभा राहिला आहे. पालकमंत्र्यांनी सोलापूरच्या विकासासाठी दिल्लीतून निधी आणायला हवा. पण हे एकमेकांविरोधात भांडत आहेत. यासाठी यांना आमदार, खासदार केले आहे का? सुभाष देशमुख म्हणातात सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर या़चे नाव देऊन तुमचे पोट भरणार आहे का? विरोधाला बाजुला ठेवून आदरणीय पवार साहेबांनी औरंगाबाद विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिले होते असे तात्काळ निर्णय घ्यायला हवे, असा सल्ला त्यांनी सरकारला दिला.
प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे बोलताना म्हणाले की, बीकेसीच्या मैदानावर आज भाजपाचा वर्धापन दिन साजरा झाला. याच मैदानावर दोन वर्षांपूर्वी मेक इन महाराष्ट्रच्या नावाने एक प्रयोग झाला होता. ४० ते ५० कोटी रुपयांची उधळण करत, प्रचंड जाहिरात करत त्या ठिकाणी दोन दिवसांचा मेळावा भरवण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते, उद्योगपती उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की ८ लाख कोटींची गुंतवणूक येत्या दोन वर्षांत महाराष्ट्रात होईल. ’मेक इन महाराष्ट्र’च्या प्रयोगाला आज दोन वर्षे पूर्ण होऊन गेली. मैदान तेच, माणसे तीच, पात्र तीच, नाटक तेच, त्याचा मसुदाही तोच. मॅग्नेटिक महाराष्ट्र नावाने असाच मेळावा झाला. पुन्हा सांगण्यात आले की महाराष्ट्रात काही लाख कोटींची गुंतवणूक होईल. पण काहीही झालेले दिसत नाही, असे ही तटकरे म्हणाले.
सोलापूर शहरात गेल्या चार वर्षांमध्ये एखादा नवीन उद्योग आला असेल आणि त्या उद्योगामध्ये रोजगाराची संधी निर्माण झाली असेल, तर सोलापुरातील एखाद्या तरुणाने या जाहीर सभेत उठून उभे राहून सांगावे. पण दुर्दैवाने कुणी काही सांगू शकणारच नाही. कारण तसे काही झालेले नाही, अशी टीका तटकरे यांनी सरकारवर केली.
जो पक्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत आहे, त्यांच्या नेत्याकडून मोठ्या अपेक्षा असतात. स्थापना दिवशी भाजपच्या प्रमुख नेत्यांनी भाषणे केली. प्रत्येक नेत्याच्या भाषणात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची दहशत दिसत होती. मला वाटले भाजपचे नेते गेल्या चार वर्षात काय केले ते भाषणात सांगतील. मात्र त्यांच्या संपूर्ण भाषणात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचाच उल्लेख होता, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला सणसणीत चपराक लगावली.
राज्यात भाजपची सत्ता जाणार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची सत्ता येणार, याचा फडणविसांनाही विश्वास आहे. त्यामुळेच ते विरोधी पक्षातील नेत्याप्रमाणे बोलत होते. पवार साहेबांविषयी बोलण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लायकी नाही. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीशी नाद करू नये, असा इशारा त्यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणात आज फक्त जनावरांचाच उल्लेख होता. कारण दिल्लीवरून रिंगमास्टर आला होता. त्याला खुश करण्यासाठी हे सर्व सुरु होते. सोलापूर महानगरपालिका एक नवा विक्रम करणार आहे. ते गिनींज बुकातही नोंद होणार असल्याचा टोला लगावून या महानगरपालिकेत एकही जनरल बॉडी मीटिंग घेतली गेली नाही. भाजपच्या दोन देशमुख या नेत्यांमुळे हे झाले, असा आरोप त्यांनी केला.


Reactions

Post a Comment

0 Comments