Hot Posts

6/recent/ticker-posts

१३ एप्रिल रोजी अरण येथे माळी समाज मेळावा

अरण(प्रतिनिधी)ः संत शिरोमणी सावता महाराज यांचे जन्मगाव श्रीक्षेत्र अरण जि. सोलापूर येथे दि.१३ एप्रिल रोजी दु.१२:३०वा.सावता परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय माळी समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे व अ.भा. महात्मा फुले समता परिषदेचे नेते आ.पंकज भुजबळ यांची मुख्य उपस्थिती राहणार असल्याचे माहिती सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा मेळाव्याचे संयोजक कल्याण आखाडे यांनी दिली आहे.
       चंदनउटी सोहळ्याच्या औचित्यावर श्रीक्षेत्र अरण विकास व माळी समाजाच्या विविध प्रश्नासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला आ. जयकुमार गोरे,आ.अतुल सावे,आ.मनीषा चौधरी,आ.प्रा.देवयानी फरांदे, आ.योगेश टिळेकर, आ.भीमराव धोंडे,आ.बळीराम सिरसकर,आ.सिद्धराम म्हेत्रे, आ.सुरेश गोरे यांच्यासह रंजनभाऊ गिरमे, बाळासाहेब माळी, शंकरराव वाघमारे,संभाजीराजे शिंदे,डॉ.निशिगंधा माळी,रमेश बारसकर, भरतरीनाथ अभंग,संभाजीराजे गोरे,ऍड.भानुदास राऊत,डॉ.प्रभाकर माळी, हरिभाऊ गावंदरे, दिलीप भुजबळ, रोहिदास सातव,गंगूताई माळी, ऍड.वासुदेव ढगे,शरणाप्पा माळी, बाबुराव जाधव,भारत माळी, शंकर देवमारे, उद्धवराव माळी, नागनाथ माळी, ज्ञानेश्वर फुले,ह.भ.प. विष्णुपंत एकतपुरे आदी राज्याच्या विविध जिल्ह्यातील मान्यवर मंडळींना निमंत्रित करण्यात आलेले आहे.
 या मेळाव्याला राज्यभरातील विविध जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून मोठया प्रमाणावर माळी समाजबांधव सहभागी होणार आहेत. तरी सोलापूर जिल्ह्यातील माळी समाजबांधवांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे असे अवाहन महादेव ताटे,सौ.कोमल म्हसवडे, मृदुल माळी, बाळासाहेब ढगे, पांडुरंग काळे,हर्षल वाघमारे,सौ.राजश्री नेवसे,काशीनाथ भुजबळ, कालिदास नन्नवरे,डॉ.धनंजय पिसे,दिनेश नाळे, डॉ.भारत कुबेर,तुकाराम माळी, अमोल माळी, सयाजी बनसोडे, राहुल दुधे,हरिभाऊ लिंगे,अनिता शिंदे,शिवाजी मेडशिंगकर, अशोक एकतपुरे,आदींनी केले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments