Hot Posts

6/recent/ticker-posts

मंगळवेढा तालुका: डिजिटल स्वाक्षरी मोहिमेची फलश्रुती, तलाठी कार्यालयातील हेलपाटे बंद

७९ गावातील ८० हजार सातबारा अपडेट
अशी आहे ’री- एडीट’ प्रक्रिया .      
 संगणकाच्या ’री- एडीट ’सॉफ्टवेअर मध्ये २७ प्रकारचे अहवाल तपासणीचे सुविधा आहे. १०० टक्के सात बारा ची तपासणी केल्यानंतर १ , ३ व ६ हे अहवाल वगळून संबंधीत तलाठी त्यामध्ये दुरूस्ती करतात. पहिली दुरूस्ती झाल्यानंतर मंडल अधिकारी ते नायक तहसीलदारांकडे याबाबतचा घोषणा पत्रक सादर केला जातो. नायक तहसीलदाराची खात्री होताच दुसरे घोषणा पत्र तहसीलदारांकडे सुपूर्द करतात, त्यानंतर तीसरे घोषणापत्र तहसीलदारांकडून घेतले जाते. दरम्यान या प्रक्रियेतील अचूकतेची खात्री पटल्यानंतर जिल्हाधीकरी त्यावर अंतिम शिक्कामोर्तब करतात.

८१ पैकी ७९ गावांच्या सात बारातील सर्व चुका दुरूस्ती झाल्या आहेत. तांत्रिक अडचणींवर मात करून हे काम पूर्ण झाले आहे. ही मोहिम अजून सुरू आहे ही संपूर्ण माहिती मुंबईतील राज्यडेटा सेंडरमध्ये स्टोअर केली जाते. पात्र शेतक-यांना आता लवकरच ड़ीजीटल स्वाक्षरीसह सात बारा मिळणार आहे. --अप्पासाहेब समिंनदर , तहसिलदार मंगळवेढा.

तलाठ्यांची बोळवन : 

महाराष्ट्र तंत्रज्ञान मंडळाकडून तलाठ्यांना लॅपटॉप देण्याचे शासनाने जाहीर केले  होते मात्र लॅपटॉप न देता केवळ ७५० रुपये डेटा कार्ड साठी देऊन प्रशासनाने बोळवण केली  तलाठ्यांनी स्वखर्चाने लॅपटॉप घेऊन संगणकीकरण चे काम पूर्ण केले तालुका  स्थरावर वर्क स्टेशन उभारण्यात आले मात्र कनेक्टिव्हिटी ची समस्या कायम होती . अशा  तांत्रिक अडचणी वर मात करून तलाठ्यांनी अखेर जिल्ह्यात मंगळवेढा तालुक्याचे  ई फेरफार चे काम सर्वधिक गतीने पूर्ण केले  - उमेश सुर्यवंशी तालुकाध्यक्ष, तलाठी संघटना मंगळवेढा




मंगळवेढा (प्रतिनिधी)ः शेतक-यांना बिनचूक सात बारा मिळावा यासाठी सुरू केलेल्या मोहिमेला तलाठ्याने पाठबळ दिल्याने मंगळवेढा शहरासह तालुक्यातील ८१ गावांना डिजीटल सात बारा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे सर्व तलाठ्यांनी स्वखर्चाने लॅपटॉप घेऊन ऑनलाईन सात बारा संगणकीय करण्याचे काम् पूर्ण केले आहे. नव्याने सुरू केलेल्या ’रि-एडीट’ प्रक्रियेतून शेतक-यांना आता डिजीटल स्वाक्षरीसह सात बारा मिळणार आहे.
internet logo साठी इमेज परिणाम त्यामुळे उता-यासाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची आवश्यकता राहिली नाही. केद्र शासनाच्या ’डिजीटल इंडिया लॅन्ड रेकॉड मॉर्डननायजेशन प्रोग्राम’ अंतर्गत सात बारा बिनचूक करण्याची मोहिम सर्वत्र सुरू करण्यात आली आहे. शासनाच्या सूचनेनुसार मंगळवेढा तालुक्यात ऑनलाईन सात बारा चे काम जुलै २०१५ रोजी सुरू करण्यात आले, यासाठी सात बारा डेटा स्कॅनिंगसाठी प्रशासनाने ई स्कॅनिंग नावाचे सॉफ्टवेअर तयार केले होते. स्कॅनिंगचे काम निवेदेमार्फत एका संस्थेला देण्यात आले होते. त्यासाठी संस्थेच्या कर्मचा-याबरोबर महसूल कर्मचा-यांनाही प्रशिक्षण देण्यात आले. त्यासाठी तहसीलदार मंडळ अधिकार व तलाठी यांनी परिश्रम घेऊन काम पूर्णत्वास आणले. सात बारा , जन्ममृत्यू नोंद पत्रक , कडई पत्रक या कागदपत्राचे स्कॅनिंग करण्यात आले सातबारा संगणिकरण केल्यानंतर चावडी वाचनाचा उपक्रम तालुक्यात राबवण्यात आला. महसूल व भूमि अभिलेख विभागाने या उपक्रमाली ई फेरफार असे नाव देले होते, मात्र चावडी वाचनाला ब-याचशा गावाच फारसा प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे तलाठ्यांना ’री -एडीट ’नावाचे सॉफ्टवेअर देऊन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तीन घोषणा पत्राची संकलपना गाव पातळीवर सुरू करण्यात आली. तलाठी म्ंडल अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, प्रांताधिकारी, ते जिल्हाधीकारी अशा प्रशासकीय पातळीवर सातबाराची  वारंवार तपासणी झाल्याने ७९ गावाताल १०० टक्के चुकांना मुठमाती मिळाली आहे. या मोहिमेत तालुक्यातील ८१ गावातील सात बारा बिनचुक करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते त्यापैकी ७९ गावातील ७ मंडल मधील ८० हजार ७३ सात बारा व ८१ हजार तीनशे पाच, आठ अ ची दुरूस्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत तब्बल ९८ टक्के काम झाले आहे. मात्र तलाठ्यांना पुरवण्यात आलेल्या अपु-या सुविधा तुटपुंज्या आर्थिक तरतुदींचा विचार केल्यास ती मोठी उपलब्धी आहे असा दावा तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष उमेश सुर्यवंशी याने केला आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments