Hot Posts

6/recent/ticker-posts

दिव्यांगांना घरपट्टी साठी ५० टक्के अनुदान ः शिवतेजसिंह

धैर्यशिल मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायतचा उपक्रम
अकलूज (प्रतिनिधी)ः अकलूज ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग असलेल्या मालमत्ता धारकांना घरपट्टी भरण्यासाठी ५० टक्के अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी दिली.माजी जि.प.पक्षनेते व अकलूज ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायतीकडून दिव्यांगासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला असून या अंतर्गत मालमत्ता धारक दिव्यांगांना घरपट्टी साठी ५० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी दिव्यांग मालमत्ता धारकांनी प्रथम आपल्या घरपट्टी ची पूर्ण रक्कम ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावी लागणार आहे त्यानंतर विहित नमुन्यातील अर्ज व रेशन कार्ड झेरॉक्स देऊन त्यांना जमा रकमेच्या ५० टक्के  म्हणजे निम्मी रक्कम अनुदान स्वरूपात ग्रामपंचायती कडून तात्काळ अदा करण्यात येईल. ग्रामपंचायत अंतर्गत विकास कामांसाठी निधी उपलब्ध होण्याचा घरपट्टी हा एक पर्याय आहे. परंतु दिव्यांग असलेल्या कारणाने अनेकांचे उत्पन्न विचारात घेता त्यांना घरपट्टी भरणे जिकिरीचे होत असल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामपंचायतीकडून दिंव्यागाच्या विकासासाठी खर्च होणार्या ३ टक्के रकमेच्या बदल्यात त्यांना घरपट्टी मध्ये ५० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी दिव्यांग मालमत्ता धारकांनी तात्काळ आपली घरपट्टी भरून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी केले 
Reactions

Post a Comment

0 Comments