Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

तालुका आरोग्य अधिकारी मेवा खाण्यात व्यस्थ...
 या गावात थाटले बोगस डॉक्टरांनी दुकाने ः तुळजापुर तालुक्यात सावरगाव,देवकुरुळी,गंजेवाडी,पांगरदरवाडी,काटी,ढेकरी पिंपळा आशा ५० गावामध्ये बोगस डॉक्टरांनी आपली दुकाने थाटली आहेत..
 गाव पुढार्‍यांना हप्ते खोरींचे लालच ः वरिल संबंधित गावातील स्थानिक गावपुढार्यांना व लोक प्रतिनिधींना हे बोगस डॉक्टर हप्ते देऊन आश्रय घेत आहेत.चिरीमिरीच्या आशेपोटी पुढारी व लोकप्रतीनिधी अभय देत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

तामलवाडी(प्रतिनिधी)ः तुळजापुर तालुक्यातील ग्रामीण भागात मेडिकल कौन्सिलची कोणतीही परवानगी नसताना अनेक बोगस डॉक्टरांनी पदवी खुंटीला टांगून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ मांडला आहे.याची आरोग्य विभागास माहिती असुनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
doctor cartoon साठी इमेज परिणामपेशंट डॉक्टरांना मानसातला देव समजतो.डॉक्टर सांगेल तो औषधउपचार करुन घेतो.मात्र तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी परिसरामध्ये डॉक्टरांनी दुकाने थाटुन डॉक्टरी पेशाचा चक्क बाजार मांडला आहे.हे महाशय दवाखान्या बाहेर मोठा बोर्ड अडकवून स्वतःचे नाव व बोगस पदवी टाकुन बिनधास्तपणे दिवसाढवळ्या सर्वसामान्य जनतेची लुट करत आहेत. ग्रामीण भागातील लोक सहसा डॉक्टरांची डिग्री पहात नाहीत.डॉक्टर दिसला की आजार कोणताही असो उपचार करुन घेतात याच भोळेपणाचा फायदा हे बोगस डॉक्टर घेत आहेत.यांच्याविरुद्ध अनेक डॉक्टरांनी व नागरिकांनी तक्रारी करुणही अशा बोगस मुन्नाभाईवर तालुका आरोग्य अधिकारी मेहरबान आहेत.हे मुन्नाभाई प्राथमिक उपचारांपासून ते थेट ऑपरेशनपर्यंतचे उपचार करत असल्यामुळे रुग्नांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.दोन वर्षापूर्वी तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे बोगस डॉक्टरने एका ३५ वर्षीय महिलेला चुकीच्या गोळ्यांचा ओव्हरडोस दिल्यामुळे तीला जीव गमवावा लागला.अवैद्य रितीने बोगस पदवी घेऊन नागरिकांच्या जिवाशी खेळल्यामुळे सावरगाव येथिल बोगस डॉक्टरावर आरोग्य विभागाने कारवाई केली होती.बोगस डॉक्टर प्राथमिक उपचारांपासून ते थेट ऑपरेशनपर्यंतचे उपचार करत असल्यामुळे रुग्नांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.अशा बोगस मुन्नाभाईवरती तात्काळ कारवाई करावी अशी मागणी तालुक्यातील डॉक्टरांनी व नागरिकांनी केली आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments