Hot Posts

6/recent/ticker-posts

अजितदादा पवार यांचेकडून बबनदादांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक

ajitdada साठी इमेज परिणाम
babandada shinde साठी इमेज परिणाममाढा (प्रतिनिधी)ः शेतक-यांचे व गोरगरीब जनतेचे कैवारी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनंतर मी जनतेसाठी स्वतःच्या प्रकृतीचा सुध्दा विचार न करता अहोरात्र झपाटून जनतेची सेवा आणि विकासकामांचा अक्षरशः डोंगर उभा करणारा माणुस म्हणजेच आमदार बबनदादा शिंदे आहेत. संपूर्ण देशात मोदींची लाट असताना माढ्याच्या जनतेने आमच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर प्रेम करीत बबनदादांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून दिले हे खूपच कौतुकास्पद असल्याचे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आमदार बबनदादा शिंदे यांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.
माढा मतदारसंघातील जनतेने सन १९९५ पासून सलग पाच वेळा बहुमताने बबनदांदाना आमदार केले आहे. म्हणूनच आजही बबनदादांची लोकप्रियता किती आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे बबनदादांच्या प्रेमापोठी भर उन्हातही आपली जागा न सोडणारी ही माढ्याची जनता होय.माढा तालुक्याच्या विकासासाठी बबनदादांनी कित्येक जणांचे हातपाय धरलेत या गोष्ठीचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्यांच्या या कामाच फलीत म्हणजेच इस्लामपूर नंतर भर उन्हातही जमलेली आजची ही अभूतपूर्व गर्दी होय .या गर्दीकडे पाहुन मला खूपच समाधान वाटले .सर्वसामान्य व गोरगरीब जनतेसाठी कोणाचेही हात पाय धरायला बबनदादांनी कधीही कमीपणा मानला नाही.म्हणुनच आज माढ्याचे नंदनवन झाले आहे. आमदार बबनदादा दिसायला साधेच आहेत पण मनात आलेले काम पक्केच करण्यात त्यांचा मोठा  हातखंडा आहे.आमच्या काळात माढ्याचे बबनदादा आलेत म्हटल की, मी त्यांना पटकन सही देऊन मोकळा होत असे कारण बबनदादा म्हटल की योग्यच काम आहे ही खात्री आम्हाला पटलेली होती.त्यामुळे सर्वांना माझी सक्त ताकीद होती की बबनदादांच एकही काम राहिल नाही पाहिजे. त्यांनी मागेल ती विकासकामे  द्या .बबनदादांनीही आपली कामे करून घेताना कसला त्रास दिला नाही .एखादे काम होत नसेल तर हातपाय धरून का होइना ते मंजुर करायचेच ही त्यांची वेगळी खासीयत आहे.
माझ्या बारामतीप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि इतर सर्व संस्था तुम्ही बबनदादांच्या हाती दिल्या आहेत.भविष्यातही हे प्रेम असेच राहू द्या असे भावनिक आवाहनही त्यांनी केले. मागील काही दिवसात बबनदादा आजारी होते पण मी व मोठ्या साहेबांनी बबनदांदाना सांगितले की, दादा घाबरू नका आपण फक्त चांगलेच केले आहे त्यामुळे जनतेचा आशिर्वाद  नक्कीच मिळणार आहे  व ते खरेही झाले.आज देशात एक नंबर गाळप करणारा पिंपळनेर ता. माढा येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना आम्ही बबनदादांना दिला याचे समाधान वाटते .त्यामुळे सर्वांनी आ. बबनदादांना व त्यांचे कुटुंबीयांना सहकार्य करा. झाले गेले सगळे विसरा यात जर कोण आडकाठी घालत असेल तर मला कळवा. मग मी पाहतो काय करायच ते असा सज्जड दमही त्यांनी भरला. शेवटी ते म्हणाले की, बबनदादांना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची व समस्यांची जाण आहे म्हणूनच जनतेचे त्यांच्यावर आणि निमगांवच्या शिंदे कुटुंबियांवर भरभरून प्रेम आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments