वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात औषधी झाडांची लागवड करणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 9, 2018

वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात औषधी झाडांची लागवड करणार

वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख

medical trees साठी इमेज परिणाममुंबई : राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या आवारात आयुर्वेदिक औषधांसाठी आवश्यक असणार्‍या वनस्पतींच्या पाच हजार झाडांची लागवड करणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख यांनी दिली. वन विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या १३ कोटी वृक्ष लागवड अभियानाअंतर्गत ही वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. देशमुख यांनी सांगितले, वन विभागामार्फत लावण्यात येणार्‍या वृक्ष लागवडीअंतर्गत चिंच, बेल, कवठ, कडूलिंब यांच्यासारखी मोठी वाढणारी झाडं लावण्यात येणार आहेत. राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या आवारात ही लागवड करण्यात येणार आहे. पोद्दार आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत देण्यात येणार्‍या रुग्णसेवेत गुणवत्तापूर्ण बदल करण्यात आले आहेत. केरळ मध्ये आयुर्वेदिक उपचाराला जाण्यापेक्षा कमी खर्चात राज्यातच ही सुविधा आता उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
आजकाल छोट्या मोठ्या आजारांसाठी लोपॅथी औषधोपचार करण्यावर भर असतो. मात्र प्राचीन काळापासून महत्त्व असलेल्या आयुर्वेदिक औषध प्रणालीमधे असलेल्या गुणांच्या आधारावर अनेक रोगांवर उपचार करता येऊ शकतात. काही आजारांमध्ये दीर्घकाळ उपचार करावे लागतात अशा वेळी आयुर्वेदातील उपचार पद्धती गुणकारी ठरते. अनेक औषधी वनस्पती आता विस्मृतीत जाऊ लागल्या आहेत. बदलत्या जीवन शैलीमुळे होणारे रक्तदाब, मधुमेह  या सारख्या आजारांवर आयुर्वेदात उत्तम उपचार पद्धती सांगितली आहे. रोजच्या परिचयातील वनस्पतींमधील औषधी गुण ओळखता यायला पाहिजेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन आयुर्वेद उपचार पद्धतीबाबत सर्व स्तरांवर जनजागृतीसाठी विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
भारतात आयुर्वेद उपचार पद्धतीत औषधी वनस्पतींना फार पूर्वीपासून वापरात आणण्यात येत आहे. जागतिकीकरणामुळे या औषधी वनस्पतीची मागणी आंतरराष्ट्रीय स्तरावरही वाढली आहे. ही मागणी लक्षात घेऊन महाराष्ट्रातील औषधी वनस्पतींची भौगोलिक नकाशानुसार उपलब्धता व या वनस्पतीच्या संकलनाचे काम राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाने केले आहे. महाराष्ट्रातील औषधी वनस्पतींच्या माहितीचे संकलन असलेल्या या डेटा बेसचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages