Hot Posts

6/recent/ticker-posts

विठ्ठलवाडीचे ग्रामसेवक कदम यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान

माढा (प्रतिनिधी)ः माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील कर्तव्यदक्ष आणि गावाला विविध पुरस्कार मिळवून देणारे आणि घाटणे ता.माढा येथील मूळ रहिवासी  ग्रामसेवक हनुमंत कदम (भाऊसाहेब) यांना सोलापूर जिल्हा परिषदेचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांच्या हस्ते सपत्निक प्रदान करण्यात आला.
सोलापूर येथे दिनांक ५ एप्रिल २०१८ रोजी झालेल्या पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी त्यांनी ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्याबद्दल हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान व गौरव करण्यात आला आहे. विठ्ठलवाडी गावाला इको व्हिलेज, जिल्हा परिषदेचा कुटुंब कल्याण पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, १०० % शौचालय युक्त ग्राम व ग्रामपंचायत आय एस ओ मानांकित करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांची आत्तापर्यंत ११ वर्षे या पदावर सेवा झाली आहे.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही. बनसोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, माजी उपसभापती बंडूनाना ढवळे, सामान्य प्रशासनचे सी.ओ.राऊत साहेब, श्रीमती सोनल कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वितरण सोहळा संपन्न झाला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह (भैय्या) शिंदे, सभापती विक्रमसिंह शिंदे, गटविकास अधिकारी गोकुळदास बैरागी, सरपंच बालाजी गव्हाणे , पोलिस उपअधीक्षक सचिन कदम, उपशाखाप्रमुख मोहन कदम, सोसायटीचे उपाध्यक्ष बाळू गुंड, पतसंस्थेचे चेअरमन अनिलकुमार अनभुले, व्हा. चेअरमन नारायण खांडेकर, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मोहन शेगर, आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड, उपसरपंच अनिलकुमार बरकडे, प्रा.अरूण कदम,अनंता जाधव,  पोस्टल बँकेचे सह व्यवस्थापक अंकुश डूचाळ, तंटामुक्ती अध्यक्ष अरुण मोरे, माजी सरपंच मनोहर बरकडे, हनुमंत जाधव, वाचनालयाचे अध्यक्ष रामचंद्र भांगे, सचिव नेताजी उबाळे,धनाजी सस्ते, उपलेखापरीक्षक सुहास शिंगाडे,विकास अधिकारी विजय गव्हाणे, बंडू खरात, किशोर गुंड, सौदागर खरात, सतीश गुंड, भिवाजी जाधव,कैलास सस्ते, पोलिस पाटील बालाजी शेगर, ग्रामसेवक सुधाकर गव्हाणे, जयराम भिसे यांच्यासह अनेकांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments