मतदार नोंदणी वाढवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न
सोलापूर (प्रतिनिधी)ः लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक व्यक्तीस मतदानाचा पवित्र हक्क बजावता यावा व सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदानामध्ये दिव्यांग व्यक्तींचा सहभाग वाढावा यासाठी जिल्ह्यात विशेष कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
याचाच एक भाग म्हणून अंध-अपंग प्रगती सोसायटी मार्फत ७ व ८ एप्रिल २०१८ रोजी रेल्वे स्टेशन, रेल्वे मैदान येथे दिव्यांग स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतिश धुमाळ यांनी दिली.
यामध्ये दिव्यांग व्यक्तींचाही सहभाग वाढावा यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत जनगणनेच्या आधारे सामाजिक संस्थाच्या मदतीने तसेच न्याय व सबळीकरण विभाग, महिला व बाल कल्याण विभागाव्दारे दिव्यांग व्यक्तींची माहिती गोळा केली जाणार आहे. दिव्यांगांची जास्तीतजास्त मतदार नोंदणी करणेत येणार आहे.
दिव्यांग व्यक्तीकरीता स्वतंत्र मतदार यादी तयार करणेत येऊन त्यामध्ये अपंगत्वाचा प्रकार दर्शविला जाणार आहे. त्याप्रमाणे विकलांग व्यक्तीकरीता मतदान केंद्रांवर सुविधा मिळण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच त्यांचे करीता सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी कार्यालय यांचे व्दारे विकलांग व्यक्तींना ओळखपत्र देण्याची मतदार सहाय्यता केंद्राव्दारे कार्यवाही करण्यात येणार आहे. दिव्यांग व्यक्तींना रांगेत उभा राहून कोणत्याही गोष्टींची प्रतिक्षा करावी लागणार नाही असे नियोजन करणेत येणार आहे.
स्वीप अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना विविध सेवा पुरविण्याकरीता अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच विविध माध्यमांव्दारे व्यापक प्रसिध्द देण्यात येणार आहे. प्रादेशिक भाषा, सांकेतीक भाषा व ब्रेलचा वापर करून तसेच प्रसिध्दी कामी साहित्य सामग्री तयार करणेत येणार आहे. दिव्यांग व्यक्तींना शिक्षित व प्रेरणा देण्यासाठी विशेष / मोबाईल शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. दिनांक ७ व ८ एप्रिल २०१८ रोजी आयोजित केलेल्या स्पर्धेच्या ठिकाणी तहसिल कार्यालय, दक्षिण व उत्तर यांच्या मार्फत निवडणूक विषयक माहिती देण्यासाठी स्टॉल लावण्यात येणार आहेत.
तसेच यावेळी १ जानेवारी २०१८ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या दिव्यांग व्यक्तींचे व नवमतदारांचे मतदार नोंदणीचे फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमास सोलापूर शहरातील दिव्यांग मतदारांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन धुमाळ यांनी केले आहे.

0 Comments