आदर्श गुंडचे विभागीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत विजेतेपद; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, November 16, 2026

आदर्श गुंडचे विभागीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत विजेतेपद; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

 आदर्श गुंडचे विभागीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत विजेतेपद; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

कोंडी (कटूसत्य वृत्त):- विजयसिंह मोहिते-पाटील कनिष्ठ महाविद्यालय, कोंडी येथील विद्यार्थी आदर्श गुंड याने १९ वर्षांखालील वयोगटातील विभागीय स्तरावरील सॉफ्ट टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावत घवघवीत यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्याची राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागीय स्तरावरील सॉफ्ट टेनिस स्पर्धेत आदर्श गुंड याने आपल्या उत्कृष्ट खेळाचे कौशल्य दाखवत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले. त्याच्या या दमदार कामगिरीमुळे त्याला राज्यस्तरावर खेळण्याची संधी मिळाली आहे. आगामी राज्यस्तरीय स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल, बारामती येथे होणार आहे.

आदर्शने मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ, महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले. तसेच आगामी राज्यस्तरीय स्पर्धेतही उज्ज्वल कामगिरी करून महाविद्यालयाचा व कोंडी गावाचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा दिल्या.

आदर्शच्या या यशामुळे विजयसिंह मोहिते-पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, कोंडी परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages