एसबीपीआयएम येथे कोरिया व्यवसाय आणि संस्कृती कार्यशाळा संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, November 2, 2026

एसबीपीआयएम येथे कोरिया व्यवसाय आणि संस्कृती कार्यशाळा संपन्न

एसबीपीआयएम येथे कोरिया व्यवसाय आणि संस्कृती कार्यशाळा संपन्न




पिंपरी, पुणे (कटूसत्य वृत्त):-   पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे इंडिया कोरिया एज्युकेशन अँड ट्रेनिंग सर्व्हिसेस (आय केट्स), कोरिया एसएमई अँड स्टार्ट अप्स एजन्सी (कोस्मे) आणि स्टारजिन यांच्या संयुक्त विद्यमाने एमबीए विद्यार्थ्यांसाठी कोरिया व्यवसाय आणि संस्कृती ऑफलाइन व ऑनलाइन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. 
    यावेळी कोरिया एसएमई अँड स्टार्टअप्स एजन्सीचे (कोस्मे) संचालक सेउंग जंग कांग, एसबीपीआयएम च्या संचालक डॉ. कीर्ती धारवाडकर, शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ. रूपाली कुदरे, डॉ. ऐश्वर्या गोपाल कृष्णन, डॉ. प्रणिता बुरबुरे आदी उपस्थित होते.
  यावेळी संचालक सेउंग जंग कांग यांनी कोरियन व्यावसायिक पद्धती, कॉर्पोरेट संस्कृती, उद्योजकता, नावीन्य आणि आंतर सांस्कृतिक दृष्टिकोन तसेच कोरियाची गतिमान व्यावसायिक परिसंस्था आणि जागतिक बाजारपेठ, व्यावसायिक शिष्टाचार, संवाद, सहकार्य आणि यशस्वी आंतरराष्ट्रीय संबंध या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.  
    पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages