'राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारा'ने दयानंद चौधरी सन्मानित - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, November 6, 2026

'राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारा'ने दयानंद चौधरी सन्मानित

'राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारा'ने दयानंद चौधरी सन्मानित



 करमाळा,(कटूसत्य वृत्त):-  शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या माध्यमातून दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६-२७ करमाळा नगरपालिकेच्या पी. एम. श्री. सा. ना. जगताप प्राथमिक मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक दयानंद छगन चौधरी सर यांना प्राप्त झाला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव झाला असून, शिक्षक, शिक्षणप्रेमी आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना दयानंद चौधरी सर यांनी शाळेची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी, विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शाळेत आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांचे अध्यापनातील योगदान, विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ आणि शिक्षण क्षेत्रातील सकारात्मक दृष्टिकोन उल्लेखनीय आहे. विशेष म्हणजे, शाळेला केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पी. एम. श्री. (प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया) योजनेअंतर्गत स्थान मिळवून देण्याच्या प्रक्रियेतही चौधरी सरांचे प्रयत्न आणि मेहनत महत्त्वपूर्ण ठरली आहे. शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे शाळेच्या प्रगतीला नवी दिशा मिळाली. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल केली आहे.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच शाळेचा सर्वांगीण विकास साधण्याच्या त्यांच्या कार्याची दखल आता राज्यस्तरावर घेतली गेली आहे. राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराच्या रूपाने त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव झाला असून, हा सन्मान त्यांच्या आजवरच्या मेहनतीची आणि समर्पणाची पोचपावती मानली जात आहे.
चौधरी सर यांना पुरस्कार प्राप्त झाल्याचे समजल्यानंतर त्यांच्या शाळेतील सर्व शिक्षक वृंदांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याबद्दल चौधरी सर यांनी सर्व शिक्षक वृंदांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. एका शिक्षकाने आपल्या कार्यातून शाळेची ओळख निर्माण करणे आणि त्याच कार्याची राज्यस्तरावर दखल घेतली जाणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. दयानंद चौधरी सर यांना मिळालेला हा सन्मान करमाळा शहरातील शैक्षणिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरणारा असून, त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages