अशोक कामटे संघटनेच्यावतीने भव्य किल्ले स्पर्धांचे आयोजन. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, November 4, 2026

अशोक कामटे संघटनेच्यावतीने भव्य किल्ले स्पर्धांचे आयोजन.

 अशोक कामटे संघटनेच्यावतीने भव्य किल्ले स्पर्धांचे आयोजन.



सांगोला (कटूसत्य वृत्त):- शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने सांगोला (सोलापूर) येथे प्रतिवर्षीप्रमाणे भव्य किल्ले बांधणी स्पर्धा आयोजित करण्यात येते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात युवा पिढीची आपल्या मातीशी आणि इतिहासाशी असलेली नाळ जुळून राहावी, या उद्देशाने या उपक्रमाचे सातत्याने आयोजन केले जाते. या भव्य किल्ले स्पर्धेचे हे 17 वे वर्ष आहे.
संस्थेचे संस्थापक निलकंठ शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी दिवाळीच्या काळात ही स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडते.
 स्पर्धेचे स्वरूप व वैशिष्ट्ये
 गटवारी: ही स्पर्धा सामान्यतः तीन प्रमुख गटांमध्ये घेतली जाते – शालेय गट, महाविद्यालयीन गट आणि खुला गट. त्यामुळे लहान मुलांपासून ते इतिहासप्रेमी तरुणांपर्यंत सर्वांना यात सहभाग घेता येणार आहे.
परीक्षण: ऐतिहासिक अचूकता, किल्ल्याची प्रतिकृती, दुर्गमतेचे सादरीकरण आणि कल्पकता या निकषांवर किल्ल्यांचे परीक्षण केले जाते.पारितोषिक वितरण: स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना संघटनेच्या तोरणा कार्यालयात (स्टेशन रोड, सांगोला) आयोजित भव्य समारंभात आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास आणि महाराष्ट्राची गड-किल्ले परंपरा जपण्याचे मोलाचे कार्य ही संघटना 17वर्षापासून आहे करत आहे.नोंदणी किंवा सहभागाची अंतिम तारीख 9 नोव्हेंबर 2026 रोजी 5 वा पर्यंत संघटनेच्या स्टेशन रोड येथील तोरणा, शिंदे मशिनरी स्टोअर्स या ठिकाणी करावी
संपूर्ण किल्ला व त्याचे फोटो , माहिती व व्हिडिओ मकरंद पाटील 9850048514, प्रा प्रसाद खडतरे
 9420726303 यांच्या व्हाट्सअप वर पाठवून नाव नोंदणी करावी असे आवाहन शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages