प्रा. रुपाली पाटील यांना पीएचडी प्राप्त
पिंपरी, पुणे (दि. ३ नोव्हेंबर २०२६) भारती विद्यापीठाचे न्यू लॉ कॉलेज पुणे येथील संशोधन केंद्राच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणाऱ्या प्रा. रुपाली पाटील यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएचडी) पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली. "आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी - पश्चिम महाराष्ट्राच्या विशेष संदर्भातील समस्या आणि आव्हाने" या विषयावर त्यांनी संशोधन सादर केले होते. भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज, पुणे येथील प्रा. डॉ. जयश्री खंदारे यांनी मार्गगदर्शन केले. भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज, पुणेचे प्राचार्य, न्यू लॉ कॉलेज, सांगली च्या प्राचार्य डॉ . पूजा नरवाडकर तसेच यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज, कराडचे प्राचार्य डॉ. सतीश माने यांचे सहकार्य मिळाले.

No comments:
Post a Comment