शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलमध्ये दिवाळी पार्टीचे आयोजन
अकलूज (कटूसत्य वृत्त):- शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूल यशवंतनगर, प्रथम सत्राचा शेवटचा दिवस हा विशेष आनंदमय करण्यात आला. प्रशालेतील ज्युनिअर केजी, सिनियर केजी, पहिली ते नववी च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले आकाशकंदील,कागदकाम, रंगकाम, रांगोळी या विविध हस्तकलेचे प्रात्यक्षिक-काम इयत्ता नववीच्या वर्गात सजले होते.
मुख्याध्यापक जितेंद्र माने देशमुख यांनी विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना गरिबांना मदत करा, सर्वांशी आपुलकीने बोला वागा, तसेच सुट्टी आहे म्हणून घरच्या अभ्यासाला विसरू नका. बालपणाचा आनंद घ्या पण दिवाळीत फटाके फोडताना काळजी घ्या तसेच मोठ्यांसोबतच फटाके फोडा असे आवाहन केले.
तसेच खासदार धैर्यशील मोहिते पाटील व शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते पाटील यांचा दिवाळी शुभेच्छा संदेश पोहोचविला व त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा यशस्वीपणे काम करीत असल्याचे सांगताना, विविध उपक्रमाची माहिती त्यांनी दिली.
प्रशालेतील सकाळ सत्रच्या को ऑर्डिनेटर शिल्पा नारायणकर यांनी दिवाळी सणाचे महत्त्व सांगताना, दिवाळी सण किती दिवस साजरा करतात, प्रत्येक दिवसाचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक दिवाळी फटाके मुक्त दिवाळी करण्याचा संदेश दिला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सकाळ सत्रच्या सर्व महिला शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील शिक्षक पृथ्वीराज सरवदे यांनी केले तर विशेष आनंदाची बाब म्हणून,शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ शिल्पा जाधव यांची दुपार सत्रच्या कोऑर्डिनेटर पदी नेमणूक झाल्याबद्दल आणि शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलच्या स्थानिक व्यवस्थापन समितीमध्ये शिक्षक प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार मुख्याध्यापकजितेंद्र माने देशमुख यांचे हस्ते करण्यात आला.

No comments:
Post a Comment