कर्मयोगी शंकररावजी पाटील साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध; हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व २१ उमेदवार निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 5, 2026

कर्मयोगी शंकररावजी पाटील साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध; हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व २१ उमेदवार निवड

कर्मयोगी शंकररावजी पाटील साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध; हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व २१ उमेदवार निवड



इंदापूर (कटूसत्य वृत्त):-  अंकुश भोसले  महात्मा फुलेनगर–बिजवडी (ता. इंदापूर) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याची सन २०२१–२०३१ ची पंचवार्षिक निवडणूक राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री तथा कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (दि. ४) बिनविरोध पार पडली. कारखान्याच्या २१ जागांसाठी २१ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाली असल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी केली.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस बुधवारी (दि. ४) होता. या दिवशी एकही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नसल्याने २१ जागांसाठी २१ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले. त्यामुळे कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत स्पर्धा न राहता सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील तसेच राजवर्धन पाटील यांचाही निवड झालेल्या उमेदवारांमध्ये समावेश आहे.
*सर्वपक्षीय सहकार्याबद्दल आभार*
कारखान्याची निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार पार्थ पवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, प्रदीप गारटकर, प्रवीण माने आदी सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासदांनी सहकार्य केले. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी दाखवलेल्या एकतेबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले.
*बिनविरोध निवड झालेले २१ उमेदवार*
पाटील हर्षवर्धन शहाजीराव, पाटील राजवर्धन हर्षवर्धन, शुक्ला राकेश रमेशप्रसाद, सरडे रविंद्र वामन, शिदे शांतीलाल दत्तात्राय, भोगळे छगन धोडीबा, देवकर निलेश शामराव, देवकर राजेद्रकुमार प्रतापराव, काळे संतोष लक्ष्मण, देवकर श्रीकांत खिंवराव, खर्चे विजय विठ्ठल, जाधव पराग रमेशराव, निकम रणजित नामदेव, गायकवाड रोहित राजेद्र, नलवडे बिभिषण कल्याण, शिगाडे अतुल शिवाजी, मोहोळकर वसंत खंडू, पारेकर हरिश्चंद्र सदाशिव, पवार रत्नमाला संपत, व्यवहारे सुमन नारायण आणि जाधव अमोल सुभाष.
*पुढील वाटचाल*
बिनविरोध निवड झाल्यानंतर कारखान्याच्या नव्या संचालक मंडळाकडे ऊस उत्पादक सभासदांच्या हिताचे रक्षण, ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन, कारखान्याची आर्थिक स्थैर्य व गिरणीची कार्यक्षमता वाढवण्याची जबाबदारी येणार आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना योग्य दर व वेळेत ऊसाचे पैसे मिळवून देणे तसेच कारखान्याचा विकास अभियान पुढे नेणे, ही नव्या संचालक मंडळासमोरील महत्त्वाची आव्हाने असल्याचे यावेळी बोलले जात होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages