मुलींनो कायदा सक्षम असल्यामुळे रॅगिंग सारखे छळ सहन करू नका- ॲड सोनाली कटकधोंड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, November 3, 2026

मुलींनो कायदा सक्षम असल्यामुळे रॅगिंग सारखे छळ सहन करू नका- ॲड सोनाली कटकधोंड

मुलींनो कायदा सक्षम असल्यामुळे रॅगिंग सारखे छळ सहन करू नका- ॲड सोनाली कटकधोंड




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- भारताच्या संविधानाने मुलींना सुरक्षित जीवन जगण्याचा हक्क दिला आहे, न्याय संहितेमध्ये कडक  कायदे करण्यात आले आहेत, म्हणून मुलींनी रॅगिंग व छेडछाड सहन करू नये कायद्याचा आधार घेऊन अन्यायाविरुद्ध खंबीर भूमिका घेतली पाहिजे असे प्रतिपादन ॲड सोनाली कटकधोंड यांनी केले.

महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील महिला विकास कक्ष व अँटी रॅगिंग समितीच्या वतीने कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी प्रा डॉ शितल झिंगाडे भस्मे, प्रा मनीषा शिंदे, प्रा हर्षदा गायकवाड उपस्थित होते.

प्राध्यापिका डॉ शितल झिंगाडे म्हणाले की, मुलीं व महिलांसाठी शाळा महाविद्यालय, रेल्वे स्टेशन, बस स्थानके, सरकारी व खाजगी कार्यालये आदी ठिकाणी कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे. नुकतेच हायकोर्टाने मासिक पाळीच्या वेळी हक्काची आणि सुरक्षित जागा मिळावी म्हणून पिंक रूम या विशेष कक्षाची संकल्पना प्रत्यक्षात आणावी असा आदेश दिला आहे. पिंक रूम ही महिलांच्या आत्मसन्मानाची आरोग्याची व सुरक्षिततेची हमी देणारी प्रभावी व्यवस्था आहे असे हायकोर्टाने म्हटले आहे. तिचा महिलांनी उपयोग करून घेतला पाहिजे.

मनीषा शिंदे म्हणाले की, महिलाचा सन्मान करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकांचे सामाजिक व नैतिक कर्तव्य आहे. अशा कार्यशाळेमुळे महाविद्यालयीन परिसर अधिक सुरक्षित संवेदनशील व भेदभाव मुक्त होईल असा विश्वास वाटतो.

कार्यशाळेचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस आर लोखंडे यांनी केले, सूत्रसंचलन कुमारी स्नेहा गायकवाड यांनी केले तर आभार प्राध्यापिका ऐश्वर्या तारापुरे यांनी मानले.

चौकटीतील मजकूर

महिलांना कायद्याचे कवच

हिंसाचारापासून संरक्षण कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा,लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा, बालविवाह  कायदा, अँटी रॅगिंग या सारख्या कायद्याचे कवच महिलांना देण्यात आले आहेत, त्यामुळे महिला सुरक्षित असून अन्याय, अत्याचार, शोषण आणि भेदभाव दूर झाले आहेत. असे प्रतिपादन ॲड सोनाली कटकधोंड यांनी आपल्या भाषणातून सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages