जागतिक क्रीडा क्षेत्रात बंजारा समाजाचा मानाचा तुरा! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, November 6, 2026

जागतिक क्रीडा क्षेत्रात बंजारा समाजाचा मानाचा तुरा!

जागतिक क्रीडा क्षेत्रात बंजारा समाजाचा मानाचा तुरा!

सुयश संजय आडे यांची ऐतिहासिक कामगिरी; भव्य सत्कार सोहळ्यात कौतुकाचा वर्षाव!




धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात असलेल्या शीगोली तांड्याचा सुपुत्र  सुयश संजय आडे याने आपल्या अफाट मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि जिंकण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात भारताचा तिरंगा अभिमानाने उंचावला आहे.


चीनमधील जिंगशान येथे आयोजित  ५ व्या जागतिक ज्युनिअर सॉफ्ट टेनिस चॅम्पियनशिप २०२६ या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुयशने आपल्या असामान्य खेळाच्या जोरावर मुलांच्या १८ वर्षांखालील एकेरी गटात भारतासाठी पहिले आंतरराष्ट्रीय रौप्यपदक (सिल्व्हर मेडल) पटकावण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला. तसेच सांघिक गटात कांस्यपदक (ब्राँझ मेडल) मिळवून भारताच्या पदकतालिकेत मोलाची भर घातली.


ही कामगिरी केवळ एका खेळाडूचे यश नाही, तर शीगोली तांडा, तुळजापूर तालुका, धाराशिव जिल्हा आणि संपूर्ण बंजारा समाजाच्या अभिमानाचा सुवर्णक्षण आहे. ग्रामीण भागातून पुढे येत जागतिक स्तरावर आपल्या कौशल्याचा ठसा उमटवणाऱ्या सुयशने हे सिद्ध केले आहे की, परिस्थिती कोणतीही असो, मनात जिद्द, मेहनत आणि ध्येयाप्रती निष्ठा असेल तर यशाचे शिखर गाठता येते!


या अभूतपूर्व यशाबद्दल *बंजारा विरासत संघ, सोलापूर व संदीप अण्णा राठोड जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने  सुयश संजय आडे याचा भव्य-दिव्य सत्कार करून त्याच्या यशाचा गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सुयशचे अभिनंदन करत त्याच्या पुढील क्रीडा प्रवासासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.


या सत्कार सोहळ्याप्रसंगी अंकुश राठोड, संदीप अण्णा राठोड, प्रकाश चव्हाण, संजय राठोड, विशाल जाधव, किसन राठोड, बाबू पवार, सुमित पवार, रितेश राठोड, श्रेयस राठोड, कुणाल पवार, सुजित पवार, सुयश पवार संदेश पवार प्रशांत राठोड 

 निरोज पवार यांच्यासह अनेक मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 सुयश, तुझ्या रॅकेटमधून निघालेला प्रत्येक फटका आज जागतिक स्तरावर आपल्या समाजाच्या सामर्थ्याची ओळख निर्माण करत आहे. तुझ्या या यशाने अनेक नवोदित खेळाडूंना स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा दिली आहे.


आज तुझ्या गळ्यात पडलेली पदके ही केवळ धातूची पदके नाहीत, तर तुझ्या कष्टांची, संघर्षाची, आई-वडिलांच्या स्वप्नांची आणि समाजाच्या विश्वासाची अनमोल पावती आहेत!


अभिमान आहे तुझा सुयश!

तुझी ही विजयाची घोडदौड अशीच सुरू राहो. उद्या जागतिक सुवर्णपदक आणि ऑलिम्पिकच्या मैदानावर भारताचा तिरंगा फडकवण्याचे तुझे स्वप्न साकार होवो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!


शीगोली तांड्याचा अभिमान... धाराशिवचा स्वाभिमान... बंजारा समाजाचा जागतिक सन्मान!


हार्दिक अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages