सेवा संकल्प अभियान अंतर्गत 'तिशीचा पल्ला; तपासणी अन् सल्ला' - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 7, 2026

सेवा संकल्प अभियान अंतर्गत 'तिशीचा पल्ला; तपासणी अन् सल्ला'

 सेवा संकल्प अभियान अंतर्गत 'तिशीचा पल्ला; तपासणी अन् सल्ला'




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या असंसर्गजन्य आजारांवर वेळेत नियंत्रण मिळवण्यासाठी सोलापूर जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने १ सप्टेंबर २०२६ ते १० डिसेंबर २०२६ या कालावधीत 'तिशीचा पल्ला, तपासणी अन् सल्ला' हे १०० दिवसांचे विशेष अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील ३० वर्षांवरील सर्व नागरिकांची घरोघरी तसेच आरोग्य केंद्रांवर मोफत तपासणी केली जात आहे.
मधुमेह (Diabetes), उच्च रक्तदाब (Hypertension) आणि तोंड, स्तन व गर्भाशय मुखाचा कर्करोग (Cancer) यांचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान करून रुग्णांना वेळेत उपचार मिळवून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
अभियानाची ठळक वैशिष्ट्ये आणि आतापर्यंतची कामगिरी:
  घरोघरी आरोग्य सर्वेक्षण: गाव, वाडी आणि वस्ती पातळीवर आशा स्वयंसेविका, एएनएम (ANM), एमपीडब्ल्यू (MPW) आणि समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) यांची विशेष पथके प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करत आहेत.
  १.४६ लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी: जिल्ह्यात आतापर्यंत ३० वर्षांवरील १,४६,७११ लाभार्थ्यांची मोफत तपासणी पूर्ण झाली आहे.
  उच्च रक्तदाब व मधुमेह निदान: तपासणीदरम्यान ९,७०४ रुग्णांमध्ये उच्च रक्तदाब तर ८,०९९ रुग्णांमध्ये मधुमेह आढळून आला असून त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत.
  कर्करोग संशयित तपासणी व संदर्भ सेवा:
    मुखाचा कर्करोग: ३९,३८० जणांची तपासणी झाली असून, १५२ संशयितांना पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
   स्तन कर्करोग: १८,९७९ महिलांची तपासणी झाली असून, ६२ संशयित महिलांना संदर्भित करण्यात आले आहे.
    गर्भाशय मुख कर्करोग: १८,१३० महिलांची यशस्वी तपासणी पूर्ण झाली आहे.
  प्रगत व मोफत उपचार सुविधा: लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात संदर्भासाठी (Referral) पाठवले जात आहे. तेथे विशेषतज्ज्ञांमार्फत मॅमोग्राफी, बायोप्सी आणि FNAC यांसारख्या अत्याधुनिक तपासण्या पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages