दहशत माजवणारे सराईत चोरटे जेरबंद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 7, 2026

दहशत माजवणारे सराईत चोरटे जेरबंद

 दहशत माजवणारे सराईत चोरटे जेरबंद





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- हातात शस्त्र बाळगून शहरात दहशत माजवणाऱ्या आणि दुचाकी चोऱ्या करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदाराला जेरबंद करण्यात एम.आय.डी.सी. पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मोठे यश आले आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या या आरोपींकडून तीन लाख ९५ हजार रुपये किमतीच्या एकूण ८ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या. याबाबत पोलिस आयुक्‍त एम. राजकुमार यांनी अधिक माहिती दिली.

एक ऑक्टोबर रोजी दुपारी एम.आय.डी.सी. गुन्‍हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अल्‍फाज शेख यांना माहिती मिळाली की, अक्कलकोट रोडवरील गदगीनगर भागात दोन इसम हातात कोयता घेऊन दहशत माजवत फिरत आहेत. लागलीच गुन्हे प्रकटीकरण पथकाने तातडीने सापळा रचून सैफन ऊर्फ सोहेल नूरउद्दीन बागवान (वय २७, रा. किसान नगर, सोलापूर) आणि मोहन नागनाथ साळुंखे (वय ४३, रा. जुना विडी घरकुल, सोलापूर) यांना ताब्‍यात घेतले. त्‍यांच्‍याकडे अधिक चौकशी केली असता त्‍यांनी दोघांनी मिळून शहरातून आठ मोटारसायकलींची चोरी केल्याची कबुली दिली.

आरोपींनी चोरी केलेल्या या दुचाकी अक्कलकोट रोडवरील राजीव नगर भागातील मैदानातील पडक्या इमारतीजवळ, झाडीझुडपात लपवून ठेवल्या होत्या त्‍या पोलिसांनी जप्‍त केल्या. पकडण्यात आलेल्या आरोपींपैकी मोहन नागनाथ साळुंखे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर सोलापूर शहरात मोटार सायकल चोरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि महिलांविषयक गुन्हे असे एकूण २० गंभीर गुन्हे दाखल आहेत तर दुसरा आरोपी सैफन उर्फ सोहेल याच्यावर ८ गुन्हे दाखल आहेत दोघांवर एम.आय.डी.सी. पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रितम यावलकर, सहाय्यक आयुक्त अरुण देवकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.एस. बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार राकेश पाटील, एकनाथ उबाळे, संदीप जावळे, सचिन भांगे, आमसिद्ध निंबाळ, नागेशसिंह चव्हाण, सचिनकुमार लवटे, सुहास अर्जुन, अमरसिंग शिवशिंगवाले, कुमार बोल्ली, अजित माने, सकलेन मुकादम, अविनाश दिघोळे व अमोल खरातमल यांनी बजावली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages