मार्श हॉस्पिटल येथे आयोजित पत्रकार परिषदेत पुढे बोलताना डॉ.राहुल पाटील म्हणाले की
टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त) : - पुणे येथील संचेती हॉस्पीटल व टेंभुर्णी येथील मार्स हॉस्पिटल व पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने टेंभुर्णीत मार्स हॉस्पिटल येथे रविवारी ०१ नोव्हेंबर २०२६ रोजी दु.०१ ते सायंकाळी ०६ वा.पर्यंत मोफत हाडांच्या संदर्भात तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.या शिबिराचा टेंभुर्णी व परिसरातील गरजू लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन अस्थिरोग तज्ञ डॉ.राहुल पाटील यांनी प्रकार परिषदेत केले.
मार्श हॉस्पिटल येथे आयोजित पत्रकार परिषदेत पुढे बोलताना डॉ.राहुल पाटील म्हणाले की,या शिबिरात मणक्याचे आजार,गुडघ्याचे आजार, सांधे व संधीवात,कंबर,मान,पाठदुखी,मणक्या चे, दुखणं तसेच हाडाच्या संबंधित सर्व प्रकारचे तपासणी करण्यात येणार आहेत.
या शिबिरासाठी पुणे येथील संचेती हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.पराग संचेती,डॉ दर्शन सोनवणे,डॉ भिलारे यांच्या सह सर्व तज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित राहणार आहे.या शिबिरामध्ये मणक्याचे आजार,गुडग्याचे आजार,संधीवात अशा विविध प्रकारचे तपासणी करण्यात येणार आहेत. पत्रकार परिषदेस केले डॉ.अमोल माने,डॉ.मदन कांबळे,डॉ लालासाहेब शेंडगे,डॉ अजिनाथ रोटे आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment