वडिलांच्या शुभहस्ते फित कापून नव्या कार्यालयाचा शुभारंभ; ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला बळ देण्याचा संकल्प
पांगरी (कटूसत्य वृत्त) : ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक व्यवहारांसाठी सक्षम आणि विश्वासार्ह पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पांगरी येथे राजमुद्रा मल्टी-स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या मुख्य कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा सोमवार, दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहात पार पडला. संस्थेचे मुख्य कार्यालय पांगरी पोलीस ठाण्याच्या समोर, बार्शी रोड येथे सुरू करण्यात आले असून, संचालकांच्या वडिलांच्या शुभहस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलन, श्रीफळ अर्पण आणि नारळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी पंच, मान्यवर, नागरिक आणि संस्थेशी संबंधित पदाधिकारी व संचालक मंडळ उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
राजमुद्रा क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना बचत, विविध प्रकारच्या ठेवी, कर्ज सुविधा तसेच महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना आर्थिक पाठबळ देण्याचा संस्थेचा मानस आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, छोटे व्यावसायिक, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक व्यवहारांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने संस्थेचे हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सामान्य नागरिकांची आर्थिक उन्नती साधताना पारदर्शकता, विश्वासार्हता आणि ग्राहकाभिमुख सेवा यांना प्राधान्य देणार असल्याचा निर्धार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पांगरीसह परिसरातील नागरिकांना संस्थेच्या माध्यमातून आर्थिक सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
वडिलांच्या आशीर्वादाने संस्थेचा शुभारंभ!
संस्थापकांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सामान्य नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी पारदर्शक, विश्वासार्ह आणि सेवाभावी सहकार चळवळ उभारणे हेच संस्थेचे प्रमुख ध्येय आहे. वडिलांच्या आशीर्वादाने आज संस्थेच्या मुख्य कार्यालयाचा शुभारंभ होत असून, शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास संपादन करून संस्थेच्या माध्यमातून उत्तम आर्थिक सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
राजमुद्रा संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळ
राहुल अंबरशी पवार – अध्यक्ष
स्वाती विनायक जाधव – उपाध्यक्ष
सुहास श्रीराम चव्हाण – खजिनदार
विनायक बिभीषण गराड – संचालक
श्वेता शैलेश सदाफुले – संचालिका
कोमल प्रवीण पाटील – सचिव
अमरसिंह देशमुख – मार्गदर्शक
.jpeg)

No comments:
Post a Comment