महाराष्ट्रातील जलसंधारणासाठी वैज्ञानिक नियोजनाची गरज- खा.धैर्यशील मोहिते पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 2, 2026

महाराष्ट्रातील जलसंधारणासाठी वैज्ञानिक नियोजनाची गरज- खा.धैर्यशील मोहिते पाटील

महाराष्ट्रातील जलसंधारणासाठी वैज्ञानिक नियोजनाची गरज- खा.धैर्यशील मोहिते पाटील



अकलूज (कटूसत्य वृत्त):- सन २०२६ मधील एल निनो परिस्थिती, पर्जन्यमानातील अनिश्चितता आणि आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, महाराष्ट्रातील जलसंधारण व भूजल पुनर्भरणाच्या कामांचे शास्त्रशुद्ध आणि दीर्घकालीन नियोजन होणे आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पत्र लिहून महाराष्ट्रातील जलसंधारण व भूजल पुनर्भरणाच्या कामांसाठी केंद्रीय भूजल मंडळाच्या (CGWB) वैज्ञानिक आराखड्याचा आधार घेऊन सूक्ष्म नियोजन करण्याची मागणी केली आहे.

तसेच खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूर व सातारा जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्र देऊन, जिल्ह्यातील जलसंधारण व भूजल पुनर्भरणाच्या कामांचे वैज्ञानिक पद्धतीने नियोजन करून आगामी पाणीटंचाईच्या संभाव्य संकटावर प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages